November 27, 2022
ajinkya rahane with wife radhika

भारतीय फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. रहाणे पुन्हा एकदा वडील बनणार असून त्याची पत्नी राधिका धोपावकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. अजिंक्य रहाणे वडील बनणार असल्याची माहिती कळताच चाहत्यांनी रहाणे कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

खरंतर, अजिंक्य रहाणे मागील काही काळापासून खराब फोर्ममध्ये आहे. त्यामुळे त्यानं भारतीय संघातील स्थान गमावलं आहे. दरम्यान, रहाणेची पत्नी राधिका धोपावकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दुसऱ्या अपत्याच्या आगमनाची बातमी दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर पती अजिंक्य रहाणे, मुलगी आर्यासमवेतचा एक फोटो शेअर केला आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये दुसऱ्या बाळाचं आगमन होणार असल्याचंही तिने संबंधित पोस्टमध्ये सांगितलं आहे.

अजिंक्य रहाणेनं २६ सप्टेंबर २०१४ रोजी आपली बालपणीची मैत्रीण राधिकाशी लग्न केलं होतं. ऑक्टोबर २०१९ मध्ये या जोडप्याला पहिली मुलगी झाली. यानंतर आता ऑक्टोबर २०२२ मध्ये रहाणे कुटुंबात दुसऱ्या बाळाचं आगमन होणार आहे.

अजिंक्य रहाणेनं ३१ ऑगस्ट २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण केलं होतं. त्यानं आतापर्यंत भारतीय संघाकडून ८२ कसोटी, ९० एकदिवसीय आणि २० टी-२० सामने खेळले आहेत. त्यानं सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात मिळून ८ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. तो यावर्षी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून शेवटचा सामना खेळताना दिसला होता. यंदा त्याला दुखापतीमुळे आयपीएलमध्ये साजेशी खेळी करता आली नाही. परिणामी त्यानं भारतीय क्रिकेट संघातील आपलं स्थान गमावलं आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.