February 2, 2023
आता लाईनमध्ये लागण्याची गरज नाही, ‘या’ नव्या प्रणालीने सहज मिळेल रेल्वेचे अनारक्षित तिकीट

रेल्वे ही देशातील स्वस्त प्रवासी वाहतूक सेवा आहे. देशभरात तिचे जाळे पसरले असल्याने प्रवास करण्यासाठी लोक तिला प्राधान्य देतात. परिणामी प्रवाशांची रेल्वे स्थानकावर तिकिट काढण्यासाठी गर्दी होतानाचे तुम्ही बघितलेच असेल. गर्दीमुळे लोकांना गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वेने तिकीट आरक्षित करण्यासाठी ऑनलाईन अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून दिली. आता अनारक्षित तिकीट बुक करण्यासाठी रेल्वेने नवीन तिकीट बुकिंग प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.

मगळुरू जंक्शन आणि मंगळुरू सेंट्रलसह दक्षिण रेल्वेच्या पलक्कड विभागातील सर्व ६१ रेल्वे स्थानकांवर आता रेल्वे युटीआय अ‍ॅपवरून क्युआर कोड स्कॅन करून अनारक्षित तिकीट काढता येणार आहे. अ‍ॅपमधील बुक तिकीट मेन्यूमध्ये आता क्यू आर कोडद्वारे तिकीट काढण्याचा पर्याय देण्यात आला आहे. सिझन तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट काढण्यासाठी क्यूआर कोडचा वापर करता येणार आहे.

(५ स्टार सुरक्षा रेटिंग असूनही ‘या’ कारकडे ग्राहकांची पाठ, शेवटी बंद करण्याचा मारुतीचा निर्णय)

रेल्वेच्या घोषणेनुसार, दक्षिण रेल्वे मार्गांवर खाजगी एजन्सीद्वारे चालवल्या जाणार्‍या हाल्ट स्टेशनसाठी हे वैशिष्ट्य उपलब्ध नसणार आहे. रेल्वे स्थानकातील क्यूआर कोड स्कॅन करून प्रवाशाला त्याचे नियोजित ठिकाण निवडता येईल आणि रेल्वे वॉलेट, यूपीआय, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे प्रवाशाला तिकीट काढता येणार आहे.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.