January 28, 2023
new app to find location of stolen iphone or samsung mobile

फोन हा सर्वांना प्रिय आहे. तो चोरी झाल्यास किंवा हारपल्यास जीव कासावीस होतो, कारण त्यात इमेज, व्हिडिओच्या स्वरुपात आपल्या आठवणी जपलेल्या असतात. महत्वाचा डेटा देखील असतो. या डेटाचा कुणी गैरफायदा घेऊ शकतो. त्यामुळे फोन हरवल्यावर किंवा चोरी झाल्यास तुमचा डेटा आणि पैसा सुरक्षित राहण्यासाठी पुढील उपाय केल्यास मोठे नुकसान टळू शकते.

फोन चोरी झाल्यावर आपण पोलिसांकडे तक्रार करतो, तसेच फोन ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, अशावेळी फोनमधील डेटाकडे दुर्लक्ष होते. हा डेटा डिलिट करता येऊ शकतो, तसेच तुमचे देखील सिम ब्लॉक करता येऊ शकते. केवळ यासाठी पुढील उपाय करावे लागतील.

(अनोख्या फीचरसाठी प्रायव्हसी धोक्यात घालू नका, व्हॉट्सअ‍ॅपचा ‘हा’ क्लोन अ‍ॅप आत्ताच अनइन्स्टॉल करा, असा करतोय हेरगिरी)

१) फोन ऑनलाइन ब्लॉक करा

टेलिकॉम विभागाने सीईआयआर नावाचे संकेतस्थळ सुरू केले आहे. मोबाइल चोरी टाळण्यासाठी आणि मोबाइल वापरकर्त्याचा हरवलेला किंवा चोरी झालेला मोबाइल ब्लॉक किंवा अनब्लॉक करण्यासाठी मदत करायला हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर जाऊन माहिती दिल्यानंतर तुचमा मोबाइल ब्लॉक केला जाऊ शकतो.

तुम्ही http://www.ceir.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपला हरवलेला किंवा चोरी झालेला मोबाईल ब्लॉक करण्यासाठी फॉर्म भरू शकता. मात्र, तुम्हाला एक एफआयआर दाखल करावी लागेल. तसेच, काही कागदपत्रे जसे मोबाईलचे बिल, पोलीस तक्रार क्रमांक आणि मोबाईल ज्या ठिकाणी हरवला त्या ठिकाणाची माहिती द्यावी लागेल. फॉर्म भरल्यानंतर हरवलेला किंवा चोरी झालेला फोन ब्लॉक करण्याची मागणी स्विकार केली जाते.

(चंद्रयान २ ची मोठी कामगिरी, चंंद्रावर शोधला ‘हा’ घटक, इस्रो म्हणाले पहिल्यांदाच..)

२) असा करा फोनचा डेटा डिलिट

जर तुम्ही अँड्रॉइड फोनचा वापर करत असाल तर http://www.google.com/android/find वर जा आणि येथे आपल्या गुगल आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा. त्यानंतर तुम्हाला फोनची माहिती आणि त्याचे ठिकाण दाखवले जाईल. आता ‘सेट अप सिक्योर आणि इरेज ऑप्शनवर’ क्लिक करा आणि आपल्या चोरी झालेल्या फोनचा डेटा रिमोटली डिलिट करा.

आयफोन वापकर्ते http://www.icloud.com/find/ वर जाऊन डेटा डिलिट करू शकतात. या संकेतस्थळावर आपल्या अ‍ॅपल आयडी आणि पासवर्डने लॉगइन करा. तुम्हाला तुमच्या अ‍ॅपल फोन्सची यादी दिसेल. यातील तुमचा फोन निवडा आणि नंतर इरेज बटनवर क्लिक करा. जर तुम्हाला फोन नंबर किंवा मॅसेज टाकण्यास सांगण्यात आले तर तुम्ही फोन हरपल्याचे सांगू शकता किंवा संपर्क कसे करावे याबद्दल सांगू शकता. असे केल्यास डिव्हाइसच्या स्क्रिनवर नंबर आणि मेसेज दिसून येतात. जर तुमचा हरवलेला किंवा चोरी झालेला आयफोन ऑफलाइन असेल तर पुढच्यावेळी ऑनलाइन असल्यास फोनचा डेटा डिलिट होऊन जाईल.

३) सीम कार्ड ब्लॉक करा

तुमचा फोन चोरी झाल्यास किंवा हरपल्यास तुम्ही सीम ब्लॉक करणे विसरू नका. चोरटे त्याचा गैर फायदा घेऊ शकतात. सीम ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला एफआयआरची प्रत टेलिकॉम ऑपरेटरला दाखवावी लागेल.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.