February 4, 2023
Buy-Sittingon-Ride-Alone

इंटरनेटवर एका लहान मुलाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा उद्यानात असलेल्या मोठ्या पाळण्यात एकटाच बसलेला दिसून येतोय. या पाळण्यात बसून बाकी इतर जण भीतीपोटी आरडाओरड करताना दिसत आहेत. पण हा मुलगा शांत बसलेला दिसून येतोय. पालकांशिवाय राईडवर बसलेल्या या एकट्या मुलाने लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित केले.

पीपल मॅगझिनच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तो आतापर्यंत ३.४ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ सर्वप्रथम व्हायरल हॉगने त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला होता. व्हायरल व्हिडीओमध्ये हा लहान मुलगा मनोरंजन पार्कमधल्या राईडवर एकटा बसलेला दिसत आहे. पाळण्यात बसल्यानंतर या मुलाच्या चेहऱ्यावर कोणताच आनंद दिसून येत नव्हता. राईडसाठी तो आनंदी किंवा घाबरला देखील नव्हता. मनात कोणत्याही भावना न ठेवता तो एका कोपऱ्यात शांत बसला होता. या पाळण्यात बसल्यानंतर त्याच्या मागे-पुढे बसलेले सारेच जण उत्सुकतेने तर कुणी घाबरून जोरजोरात ओरडताना दिसून येत आहेत. पण हा मुलगा कोणतीही उत्सुकता किंवा भीती देखील व्यक्त करत नव्हता. शून्यात पाहत असलेल्या मुलाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र संतापले आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चालत्या गाडीवर ‘शक्तिमान’ बनायला गेला अन् काही क्षणातच खाटेवर आला…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Lalit Modi-Sushmita Sen च्या नात्यावर जबरदस्त मीम्सचा वर्षाव, वाचून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल

आता या व्हिडीओने लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींना आश्चर्य वाटले की एवढा लहान मुलगा एकटा का आहे आणि त्याच्यासोबत पालकांपैकी कोणीही का नाही? राईडमध्ये सुरक्षा कवच नसल्याने ते धोकादायक ठरू शकते, असेही काहींनी सांगितले. या व्हिडीओमधला हा लहान मुलगा साधारण पाच ते सहा वर्षांचा असावा. कोलंबसच्या पाळण्यात एकटा बसलेला हा मुलगाही जांभई सुद्धा देतो. अनेक सोशल मीडिया युजर्सना हा व्हिडीओ मनोरंजक वाटला, तर इतर अनेकांनी मुलाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.