December 1, 2022
doping test

पॉवरलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, नौकानयन क्रीडा प्रकारांचाही समावेश; कुमार गटातील खेळाडूही मोठय़ा प्रमाणात विळख्यात

ज्ञानेश भुरे, लोकसत्ता

पुणे : खेळाडूंना उत्तेजक सेवनापासून रोखण्यासाठी केंद्र सरकारने एकीकडे उत्तेजक प्रतिबंध विधेयक आणले असताना देशातील क्रीडा क्षेत्र दिवसेंदिवस उत्तेजकाच्या विळख्यात अडकत चालले आहे. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीने (नाडा) जाहीर केलेल्या ताज्या यादीत पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग आणि अ‍ॅथलेटिक्स खेळातील खेळाडूंमध्ये उत्तेजक घेण्याचे वाढते प्रमाण दिसून आले आहे. याचप्रमाणे त्याचे लोण आता कुमार खेळाडूंपर्यंत पोहोचू लागल्याचे समोर येत आहे.

‘नाडा’ने प्रसिद्ध केलेल्या यादीत २००९पासून विविध खेळाडूंवर केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली आहे. यातील अनेक खेळाडू आता कारवाईतून मुक्त झाले असले, तरी दोषी आढळण्याची संख्या काही कमी होत नाही. ‘नाडा’च्या यादीनुसार २०२० ते २०२२ जूनपर्यंतच्या यादीवर नजर टाकली असताना दोषी आढळलेल्या खेळाडूंचा आलेख वाढतच आहे. या सर्व खेळाडूंवर दोन ते चार वर्षे बंदी घातली आहे.

या यादीत अ‍ॅथलेटिक्समधील खेळाडूंची संख्या अधिक आहे. पॉवरलििफ्टग, वेटलििफ्टग, शरीरसौष्ठव  खेळातील खेळाडूंचेही प्रमाण अधिक आहे. गेली दोन वर्षे व २०२२ जुलैपर्यंत पॉवरलििफ्टगमध्ये २७, वेटलििफ्टगमध्ये ३० आणि अ‍ॅथलेटिक्समध्ये ५० खेळाडूंवर यासंदर्भात कारवाई करण्यात आली आहे. यातील बरेच खेळाडू ग्रामीण भागातून आलेले आणि कुमार गटातील आहेत, ही सर्वात धक्कादायक बाब आहे.

कारवाई झालेले क्रीडापटू

’  २०२० (एकूण ८६) : शरीरसौष्ठव ४३, अ‍ॅथलेटिक्स १२, वेटलििफ्टग ९, पॉवरलििफ्टग ८, बॉिक्सग ३, ज्युडो ३, कुस्ती २, बास्केटबॉल २, मोटोरस्पोर्ट्स १, जलतरण १, बॅडिमटन १, व्हॉलिबॉल १

’  २०२१ (एकूण १२६) : अ‍ॅथलेटिक्स २७, नौकानयन २२, वेटलििफ्टग २०, पॉवरलििफ्टग १४, कबड्डी ९, ज्युडो ८, कुस्ती ६, वुशू ५, बॉिक्सग ४, व्हॉलिबॉल २, नेमबाजी २, तिरंदाजी १,  फुटबॉल १,  तलवारबाजी १, बास्केटबॉल १, क्रिकेट १, मोटोरस्पोर्ट्स १, तायक्वांदो १

’  २०२२ जुलैपर्यंत (एकूण ३२) : अ‍ॅथलेटिक्स ११, पॉवरलििफ्टग ५, कुस्ती ४, शरीरसौष्ठव ३, वेटलििफ्टग १, कॅनॉइंग २, ज्युडो १, रग्बी १, नेमबाजी १, वुशू १, पॅरा-बॅडिमटन १, तिरंदाजी १

झटपट यशासाठी खेळाडू यामध्ये गुंतत चालले आहेत. प्रशिक्षकाची जबाबदारी मोठी आहे. उत्तेजक सेवनाचे प्रमाण कमी करण्यासाठी खेळाडूंबरोबर प्रशिक्षक आणि पालकांमध्येही जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे. दोषी आढळल्यानंतर होणाऱ्या कारवाईने येणारी निराशा टाळण्यासाठी मेहनत आणि नैसर्गिक क्षमतेने मिळवलेले यश टिकून राहते, हे खेळाडूंनी समजून घ्यायला हवे.

डॉ. प्रवीण जोशी, क्रीडा वैद्यकशास्त्र तज्ज्ञ 

उत्तेजक पदार्थ सेवन करणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढणे ही चिंतेची बाब आहे. याला आळा घालण्यासाठी प्रत्येक स्पर्धेत पूर्वसूचना न देता चाचणी होणे आवश्यक आहे. देशातील किमान प्रत्येक खेळातील पहिल्या सहा क्रमांकावरील खेळाडूंची चाचणी तर व्हायलाच हवी. त्यामुळे वचक बसेल. सरकारच्या उत्तेजक प्रतिबंध विधेयकाचा जरूर फायदा होईल. फक्त त्याची अंमलबजावणी तत्परतेने हवी.

विजेंदर सिंग, अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षकSource link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.