December 1, 2022
Rane on Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut


शिवसेनेतील बंडखोरीनंतर आणि त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतरणाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले असून आता या मुलाखतीवर विरोधी पक्षांकडून प्रतिक्रियाही येऊ लागल्यात. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या असून अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली असून भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे. मात्र भाजपाचे आमदार आणि ठाकरेंचे कट्टर राजकीय विरोधक असणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी या मुलाखतीमधील एक क्लिप शेअर करताना ‘मानलं तुम्हाला’ अशी कॅप्शन देत उद्धव ठाकरेंना उपहासात्मक टोला लगावला आहे.

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; शरद पवार कनेक्शनकडे लक्ष वेधत म्हणाले, “अडीच वर्षे संपत्ती झाली आता…”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारणाऱ्या ३९ आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याच बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच थेट मुलाखतीच्या माध्यमातून बंडखोरांबरोबरच त्यांना पाठिंबा देणाऱ्या भाजपावर टीका केली आहे. ही मुलाखत आज प्रकाशित झाल्यानंतर या मुलाखतीमधील ११ सेकंदांची क्लिप शेअर करत नितेश राणेंनी या मुलाखतीवरुन खोचक शब्दांमध्ये टीका केलीय.

नक्की वाचा >> भाजपाला शिवसेना का संपवायची आहे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “आता त्यांना…”

नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर आणि भाचे वरुण सरदेसाई यांचा संदर्भत देत टीका केलीय. “वाह! उद्धवसाहेब!! अखेर तुम्ही ‘पाटणकर’ आणि ‘सरकारी भाचा’ बद्दल स्पष्टच बोललात,” अशा कॅप्शनसहीत नितेश यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. तसेच कॅप्शनच्या शेवटी त्यांनी, ‘मानलं तुम्हाला’ असं माजी मुख्यमंत्र्यांना म्हटलं आहे. या क्लिपमध्ये उद्धव ठाकरे हे, “तुझं ते ही माझं, माझं ते ही माझं. याचं ते ही माझं. त्याचं ते ही माझं. माझं ते माझं आणि तुझं ते माझं इथपर्यंत होतं आता याचंही माझं आणि त्याचंही माझं इथपर्यंत त्यांची हाव गेलेली आहे,” असं म्हणताना दिसत आहेत.

उद्धव यांनी हे वक्तव्य नेमकं कशासंदर्भात केलेलं?
नितेश यांनी उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याचा संदर्भ पाटणकर आणि सरदेसाई यांच्याशी जोडला असला तरी मुख्य मुलाखतीमध्ये हे विधान माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपा आणि बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातून केलं होतं.

नक्की वाचा >> ‘सत्ता होती तेव्हाची’ आणि ‘सत्ता गेल्यानंतर’च्या मुलाखतीमधील फरक दाखवत निलेश राणेंनी सेनेला केलं लक्ष्य; कॅप्शन चर्चेचा विषय

“मुख्यमंत्री होणं चुकलं का?” असं राऊत यांनी मुलाखतीदरम्यान उद्धव यांना विचारलं. “त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री केलं असतं तर काय झालं असतं? कारण यांची भूकच भागतच नाही. यांना मुख्यमंत्रीपदही पाहिजे आणि आता शिवसेनाप्रमुख व्हायचं आहे. शिवसेना प्रमुखांसोबत स्वत:ची तुलनाच करु लागला आहात. ही राक्षसी महत्वाकांक्षा आहे आणि याला हावरटपणा म्हणतात, त्याला सीमा नसते,” असं उद्धव ठाकरे उत्तर देताना म्हणाले..

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.