February 3, 2023
Womens-Fight-Video Viral

Womens Fight Video Viral : महिलांची भांडणं झाली की ती पाहण्यासाठी लोक एक मिनीट रस्त्यावर थांबून भांडण पाहण्यासाठी गर्दी करत असतात. कारण महिलांची भांडणं तितकी मनोरंजक असतात. महिलांमध्ये कधी कोणत्या विषयावरून भांडण होईल याचा काही नेम नाही. एकदा हा महिलांमध्ये भांडण लागलं की मग ते भांडण पुढे हाणामारीत रूपांतर होतं. यात पहिला वार ते एकमेकींच्या झिंज्या उपटण्याने करतात. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होऊ लागलाय त्यात महिला चक्क एकमेकांच्या अंगावर नाल्यातला गाळ फेकताना दिसून येत आहेत. दोन महिलांच्या अनोख्या भांडणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय.

तुम्ही महिलांना आतापर्यंत नळावर, बाजारात आणि अगदी मुंबईच्या लोकलमध्येही भांडताना पाहिलं असेल. पण या व्हायरल व्हिडीओमधल्या दोन महिला चक्क कचऱ्यावरून भांडताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शेजारी शेजारी राहणाऱ्या दोन महिला एकमेकींसोबत भांडत आहेत. दोघींनीही हातात झाडू घेतला आहे आणि कचरा एकमेकींच्या दारात कचरा फेकताना दिसत आहेत. तेवढ्यात एक म्हातारी येते आणि दुसऱ्या महिलेच्या हातून झाडू घेते. या गोष्टीचा तिला आणखी राग येतो आणि मग भिंतीला लावलेल्या गोवऱ्या काढून त्या दुसऱ्या महिलेच्या दाराकडे फेकू लागते. कचऱ्यावरून झालेलं हे भांडण फक्त गोवऱ्यावरंच नाही थांबलं तर थेट नाल्यातल्या गाळ्यापर्यंत जाऊन पोहोचलं. या दोघींचं भांडण इतकं वाढलं की दोघीही बाजुच्या नाल्यातला गाळ काढून एकमेकींच्या दारात फेकू लागल्या. काही वेळाने तर त्या एकमेकींच्या घरातही हा गाळ फेकू लागल्या.

आणखी वाचा : Lalit Modi-Sushmita Sen च्या नात्यावर जबरदस्त मीम्सचा वर्षाव, वाचून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पावसाळ्यात छत्री सुकत नाही म्हणून असं करतं का कुणी? हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

महिलांच्या या भांडणाचा व्हिडीओ sakhtlogg नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. ‘नवा दिवस, नवं भांडणं’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये वापरण्यात आलेलं बॅकग्राऊंड म्यूझिक देखील फार मजेदार आहे. महिलांच्या भांडणाला विनोदाचं रूप देणारं हे गाणं ऐकलं की तुम्ही सुद्धा अक्षरशः पोट धरून हसाल. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला २० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकजण या व्हिडीओला लाईक करत आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.