February 2, 2023
कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा : भारताची ब्राझीलकडूनही हार

भुवनेश्वर : भारतीय कुमारी (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या मोहिमेची अखेरही पराभवाने झाली. सोमवारी झालेल्या अ-गटातील अखेरच्या साखळी सामन्यात भारताला ब्राझीलकडून ०-५ असा पराभव पत्करावा लागला.

ब्राझीलकडून अलिने आणि बदली खेळाडू म्हणून उतरलेल्या लाराने प्रत्येकी दोन गोल केले. गेबी बर्चनने एक गोल केला. बर्चनने ११व्या मिनिटाला गोल करून ब्राझीलचे खाते उघडले. त्यानंतर अलिनेने ४० आणि ५१व्या मिनिटाला दोन गोल करून आघाडी वाढवली. अखेरच्या टप्प्यात लाराने ७ मिनिटांत (८६ आणि ९३व्या मि.) दोन गोल करून ब्राझीलच्या मोठय़ा विजयावर शिक्कामोर्तब केले.

प्रथमच विश्वचषक स्पर्धेचा अनुभव घेणाऱ्या भारतीय मुलींच्या संघाला एकही विजय मिळवता आला नाही आणि एकही गोल करता आला नाही. यापूर्वीच्या सामन्यात भारताला अमेरिकेकडून ०-८ आणि मोरोक्कोकडून ०-३ अशी हार पत्करावी लागली होती.

मडगाव येथे झालेल्या अ-गटातील दुसऱ्या सामन्यात अमेरिकेने मोरोक्कोचा ४-० असा पराभव केला. अ-गटातून ब्राझील आणि अमेरिका संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.