November 27, 2022
Maharashtra HSC Result 2022 date

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोल्हापूर केंद्राचा निकाल ९५.७ टक्के लागला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा साडेचार टक्केहून अधिक घसरण झाली आहे. यंदाही मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे.
कोल्हापूर विभागअंतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. यावर्षी एक लाख २१ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंद केली होती. १ लाख २१ हजार ३४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील एक लाख १५ हजार ३६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उतीर्ण होण्याचे प्रमाण ९५.७ टक्के इतके आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९६.५ टक्के आहे. पाठोपाठ सातारा जिल्ह्याचा निकाल ९४.२३ टक्के तर सांगली जिल्हा तिसऱ्या स्थानी म्हणजे ९३.९१ टक्के निकाल आहे.

करोना सरूनही पिछाडी
गतवर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा ४४.६ टक्के इतका निकाल घसरला आहे. करोना संसर्ग कमी झाल्यानंतर शाळांचे वर्ग भरत होते. अभ्यास करण्याची अधिक संधी मिळाली असतानाही निकालाचे प्रमाण घसरल्याने शिक्षणक्षेत्रात चिंता व्यक्त होत आहे.

मुलींची बाजी
या परीक्षेला ६५, ६२१ विद्यार्थी बसले होते. त्यातील ६१, २०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याचे प्रमाण ९३.२५ टक्के उत्तीर्ण झाले. तर ५५,७२९ पैकी ५४,१२० विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.२० टक्के आहे. मुलांपेक्षा मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ३.९४ टक्के इतके अधिक आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.