January 27, 2023
Gokul milk

गोकुळ दुध संघाने म्‍हैस दूध प्रतिलिटर २ रुपये व गाय दूध १ रुपये खरेदी दरात वाढ केली आहे. तर फुल क्रीम दूध विक्री दरात २ रुपये प्रतिलिटर वाढ केली आहे.

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक (गोकुळ) संघाची संचालक मंडळ बैठक होवून त्यामध्ये ही वाढ १ ऑगस्ट पासून लागू केली जाणार आहे, अशी माहिती संघाचे अध्‍यक्ष विश्‍वास पाटील यांनी शनिवारी दिली.

यापुढे म्‍हैस दूध खरेदी दर ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर ४५.५० रुपये दर राहील. गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर ३० रुपये असा दर राहील.

फुल क्रीम दूध विक्री दरात २ रुपये प्रतिलिटर वाढ –

कोल्हापूर, मुंबई, पुणे विभागामध्‍ये वितरीत होणाऱ्या फुल क्रीम दूध विक्री दरात २ रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात येणार आहे. गाय दूध,टोण्‍ड दूध, स्‍टँडर्ड दूध विक्री दरामध्‍ये कोणतीही वाढ करण्‍यात आलेली नाही. सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना पाठवणेत येणार आहेत.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.