December 5, 2022
satej patil

खासदार संजय मंडलिक हे शिंदे गटात जाण्याआधी भेटून चर्चा केली होती. त्यांना राजकारणात पुढे काय घडू शकते याविषयी माहिती दिली. जिल्ह्यात आम्ही चांगले राजकारण करीत असून जिल्ह्यातील एका प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा देत होतो. आता ते त्याच प्रवृत्तीच्या मांडीला मांडी लावून बसणार का, हा मोठा प्रश्न आहे. तरीही ते जिल्ह्यातील राजकारणात ते आमच्या सोबत राहतील, असे मत माजी पालकमंत्री, आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

राज्यातील राजकीय परिस्थिती न्यायालयाच्या निर्णयानंतरच चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे शिवसेनेमधून बंडखोरी केलेले आमदार व खासदार नेमके कोणत्या पक्षातून उभारणार, भाजप त्यांना तिकीट देणार का ? असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.

सध्या राज्यात मंत्रिमंडळ स्थापन केले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला किमान मदत पुनर्वसन मंत्री तरी द्या. राज्यात सध्या पावसाने मृत्यू होत आहेत. संकट काळात मंत्रिमंडळ गायब आणि संकट गेल्यावर पाहणी करून काय उपयोग, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

गोकुळ, जिल्हा बँकेत बदल नाही

शिंदे गटाला जिल्ह्यात पाठींबा वाढल्याने सहकार क्षेत्रावर कोणते परिणाम होतील या प्रश्नावर आमदार पाटील यांनी गोकुळ, जिल्हा बँकेच्या सत्तेत कोणताही बदल नाही. आम्ही एका प्रवृत्तीच्या विरोधात सहकारात सत्ता मिळवून एकदिलाने कारभार करीत असल्याचे सांगितले.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.