December 5, 2022
leopard skins

दिंडनेर्ली तालुका करवीर येथून दोघा व्यक्तींकडून बिबट्याचे कातडे पोलिसांनी शुक्रवारी जप्त केले. त्याची किंमत सहा लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. बाजीराव श्रीपती यादव सोनुर्ले ( वय ३९, रा. सोनुर्ले,भुदरगड) व ब्रह्मदेव शशिकांत पाटील (वय ३२, रा. किटवडे,आजरा) अशी या दोघा संशयतांची नावे आहेत.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला दोन व्यक्ती गारगोटीहून बिबट्याची कातडी विक्री करण्यासाठी दिलेले येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी भोसले, राजीव शिंदे, खंडेराव कोळी, बालाजी पाटील यांच्या पथकाने दिंडनेर्ली फाटा येथे सापळा रचला. संशयित दोघे येतात त्यांना ताब्यात घेतले. मुद्देमालासह त्यांना इस्पुरली पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.