December 1, 2022
sanjay mandlik

मुख्यमंत्री शिंदे गटासोबत राहावे असा निर्णय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घेतला असल्याचे समजले आहे. याबाबत सारासार विचार करून दोन दिवसात निर्णय घेणार आहे, असे मत शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी सोमवारी व्यक्त केले.

खासदार मंडलिक हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या हमीदवाडा येथील साखर कारखान्यावर कार्यकर्त्यांचा मेळावा होऊन त्यामध्येही या निर्णयास संमती दर्शविण्यात आली होती. याबाबत आज खासदार मंडलिक यांनी भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे सालस सुसंस्कृत कुटुंबप्रमुख आहेत. शिवसेनेच्या हितासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. अ गट ब गट असे झाले तर त्याचा शिवसैनिकांनाच त्रास होणार आहे. गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत करोना, उद्धव ठाकरे यांचे आजारपण यामुळे विकास कामे गतीने होऊ शकले नाहीत. ती होण्यासाठी आपले सरकार असणे गरजेचे आहे. गेल्या आठवड्यात काही शिवसेनेच्या खासदार काही खासदारांनी मला शिंदे गटाने घेण्याची विनंती केली होती. शिंदे गटात सहभागी होण्यासाठी कोणाचा दबाव नाही. मातोश्री किंवा ज्येष्ठ नेत्यांनी माझ्याशी चर्चा केलेली नाही, असेही मंडलिक म्हणाले.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.