January 27, 2023
कोल्हापूर : वसंत आबाजी डहाके, दिशा पिंकी शेख यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर | Kalsekar Kavya Award announced to Vasant Abaji Dahake Disha Pinki Shaikh amy 95

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा सन २०२२ चा ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ ज्येष्ठ कवी, साहित्यिक वसंत आबाजी डहाके (अमरावती) यांना, तर ‘ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार’ दिशा पिंकी शेख (श्रीरामपूर) यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

कवी सतीश काळसेकर व ऋत्विज काळसेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांचे स्वरूप अनुक्रमे रुपये २१ हजार व १० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे आहे. काळसेकर यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या देणगीतून विद्यापीठातर्फे काव्यक्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या कवीस दरवर्षी ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’, तर नव्या पिढीतील कवीस ‘ऋत्विज काळसेकर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येत आहे.

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्रा. अविनाश सप्रे, डॉ. नितीन रिंढे (मुंबई) आणि डॉ. गोविंद काजरेकर (सावंतवाडी) यांनी पुरस्कार निवड समितीमध्ये काम पाहिले, हि माहिती मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी दिली.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.