December 5, 2022
खातेदारांचे Savings धोक्यात टाकणाऱ्या ‘या’ 8 बँकांना RBI चा दणका; तुमचे अकाउंट तर नाही ना? पहा यादी

भारतीय रिझर्व्ह बँकने आठ भारतीय बँकांना आर्थिक दंड ठोठावला आहे. या डिफ़ॉल्टर यादीत महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश आहे. या कारवाईत गुजरातच्या मेहसाणा अर्बन को-ऑपरेटिव बँक वर ४० लाख रुपयांचा सर्वात जास्त दंड लगावण्यात आला असून इतर बँकांना तब्बल १- ४०लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे. शिवाय, आरबीआय ने स्पंदना स्फूर्ती फायनान्शियल या NBFC ला आर्थिक दंड लगावला आहे. खाली दिलेल्या यादी पैकी कोणत्याही बँकेत आपले सुद्धा अकाउंट असल्यास वेळीच सावध व्हा.

महाराष्ट्रातील दोन बँकांना आरबीआय कडून दंड लगावण्यात आला आहे. यामध्ये वरुद अर्बन को ऑपरेटिव्ह बँक व द यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा समावेश आहे. नागरी सहकारी बँकांना केव्हायसी जारी केलेल्या आरबीआयच्या ‘Know Your Customer’ निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल द यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ३.५० लाख रुपयांचा तर वरुद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला १ लाखाचा दंड सुनावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकने दंड ठोठावलेल्या बँक

  • छत्तीसगड राज्य सहकारी बँक
  • गोवा राज्य सहकारी बँक
  • गराहा सहकारी बँक
  • द यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक
  • जिल्हा सहकारी केंद्रीय बँक,छिंदवाडा
  • वरुद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक
  • इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक
  • मेहसाणा अर्बन आठ बँकांमध्ये सहकारी बँक

द यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ३१ मार्च २०२० पर्यंतच्या आर्थिक स्थितीवर आधारित तपासणी अहवालानंतर, बँकेने तिच्या ग्राहकांच्या केव्हायसी नियतकालिक अपडेट केले नसल्याचे उघड झाले तसेच नियतकालिक रिव्ह्यूची कोणतीही प्रणाली बँकेत उपलब्ध नसल्याचे सुद्धा समोर आले. आरबीआय केवायसी निर्देशांचे उल्लंघन केल्यामुळे खातेधारकांची बचत जोखमीत टाकल्याने आरबीआयने बँकेवर कारवाई केली आहे.

तर दुसरीकडे, वरुद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बाबत इंटर-बँक प्रतिपक्ष मर्यादेचे व केव्हायसी वरील आरबीआयच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याने संशयास्पद व्यवहारांची शक्यता ओळखून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.