February 4, 2023
चिमुकल्याने या पुतळ्याला मिठी मारली अन्…; निरागसता म्हणजे काय दाखवणारा Viral Video एकदा पाहाच

लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं, हे वाक्य आपण बऱ्याच वेळा ऐकतो आणि बऱ्याच वेळा याची आपल्याला प्रचिती येते. आपला दिवसभराचा ताण एखाद्या लहान मुलाच्या गोंडस कृती पाहून क्षणात नाहीसा होतो. सोशल मीडियावर देखील असे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी मोठ्यांच्या नकला करताना किंवा एखाद्या एखाद्या गाण्यावर स्वतःच्या वेगळ्याच स्टेप्स करणारे लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

गार्डनमध्ये किंवा अनेक ठिकाणी आपण स्टॅच्यु म्हणजेच पुतळ्याचे रूप साकारलेल्या व्यक्तींना पाहतो. अनेकवेळा त्यांचा मेकअप इतका उत्तमरित्या केलेला असतो की एखादी पुतळ्याचे रूप घेतलेली व्यक्ती खरोखरच पुतळा असल्याचा भास होतो. हे झाले आपल्या डोक्यात येणारे विचार, पण लहान मुलांना या सगळ्या गोष्टी कळत नसल्याने ते संपुर्ण जगाला फक्त एकाच नजरेतून बघतात. त्यांच्या निरागसतेमुळे त्यांना संपूर्ण जग एकसारखे दिसते. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये देखील याचीच प्रचिती येत आहे.

आणखी वाचा : फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला लॅपटॉप पण आले भलतेच काही; तक्रार नोंदवण्यासाठी शेअर केलेले फोटो झाले व्हायरल

व्हायरल व्हिडीओ :

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पुतळ्याच्या रूपात एका ठिकाणी बसलेला दिसत आहे. त्याचवेळी तिथे चिमुकला येतो. तो त्या पुतळ्याच्या जवळ जातो पण ती व्यक्ती पुतळ्यासारखी स्तब्ध राहते. पण हा लहान मुलगा जवळ जातो त्या व्यक्तीला प्रेमाने मिठी मारतो, त्यावर मात्र ती व्यक्ती पुतळ्याच्या पात्रातून बाहेर येत त्या मुलाला मिठी मारते. या लहान मुलाच्या निरागसतेने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. अनेक जणांनी या व्हिडीओवर कमेंट करत या गोंडस कृत्याचे कौतुक केले आहे. हा व्हिडीओ ‘Buitengebieden’ या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला १४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर कमेंट करत नाहीत कारण काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहा.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

Viral Video : त्याने चक्क सिंहीणीला घाबरवण्याचे धाडस केले, पुढे काय झाले एकदा पाहाच

हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.