December 5, 2022
magnus carlsen

नवी दिल्ली : जगज्जेतेपदाच्या लढतीत रस नसल्याचे स्पष्ट करीत नॉर्वेचा विश्वविजेता बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनने ग्रँडमास्टर इयान नेपोमनिशीविरुद्ध पुढील वर्षी सामना न खेळण्याचा निर्णय बुधवारी घेतला. त्यामुळे आव्हानवीर स्पर्धेतील विजेत्या नेपोमनिशीला जागतिक अजिंक्यपदासाठी उपविजेत्या ग्रँडमास्टर डिंग लिरेनशी सामना करावा लागणार आहे.

‘‘मी ‘फिडे’ आणि माझ्या चमूसह इयानसमवेत चर्चा केली आहे. मला या सामन्यातून काही साध्य होईल असे वाटत नाही. ऐतिहासिक कारणास्तव सामना मनोरंजक असेल याची मला खात्री असली तरी, माझा खेळण्याचा कोणताही विचार नाही आणि मी सामना खेळणार नाही,’’ असे पाच वेळा जगज्जेत्या कार्लसनने सांगितले. डिसेंबर २०२१मध्ये दुबई येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कार्लसनने नेपोमनिशीला ७.५-३.५ असे नामोहरम करीत पाचव्यांदा जगज्जेतेपद प्राप्त केले होते. यंदा नेपोमनिशी माद्रिद येथे झालेल्या आव्हानवीर स्पर्धेत जेतेपद मिळवत जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी सज्ज झाला होता. पण कार्लसनच्या माघारीमुळे त्याला लिरेनविरुद्धच्या लढतीसाठी तयारी करावी लागणार आहे. जागतिक लढतीत सहभागी होणार नसलो तरीही आपण खेळातून निवृत्ती घेणार नसल्याचे कार्लसनने स्पष्ट केले.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.