December 1, 2022
asia cricket cup

आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आता श्रीलंकेऐवजी संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे होणार आहे. तशी माहिती बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली यांनी दिली आहे. सध्या या काळात यूएईमध्ये पाऊस नसतो. त्यामुळे यूएई हेच आशिया चषक स्पर्धेसाठी योग्य असेल, असे गांगुली यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >> IND vs WI : पावसात दोन तास श्रेयस अय्यरची वाट बघणारी ‘ती’ तरुणी कोण?

याआधी ही स्पर्धा श्रीलंका येथे खेळवली जाणार होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून या देशावर राजकीय तसेच आर्थिक संकट ओढावले आहे. येथे अन्नधान्य तसेच इंधनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. आर्थिक दुष्टीकोनातून या देशाचे कंबरडे मोडले आहे. परिणामी येथील नागरिक प्रचंड संतापलेले आहेत. त्यामुळे आशिया चषक क्रिटेट स्पर्धा श्रीलंकेत खेळवणे योग्य होणार नाही, असा बीसीसीआयचा विचार आहे. याच कारणामुळे ही स्पर्धा आता श्रीलंका ऐवजी यूएई येथे खेळवली जाणार आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : मॅग्नस कार्लसनला बुद्धिबळ जगज्जेतेपदात रस का नाही? 

याआधी ही स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जाऊ शकते, असे संकेत श्रीलंका क्रिकेट संघटनेचे सचिव मोहन डिसिल्वा यांनी दिले होते. ‘‘आशिया चषक स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे हलवण्यात येण्याची शक्यता आहे,’’ असे डिसिल्वा म्हणाले होते.

हेही वाचा >> IND vs WI 1st ODI : रोहित शर्माच्या जागी ‘या’ मराठमोळ्या खेळाडूला मिळू शकते संधी

दरम्यान, वेळापत्रकानुसार ही स्पर्धा २६ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. मुख्य स्पर्धेपूर्वी एक पात्रता फेरी होणार आहे. ज्यामध्ये हाँगकाँग, सिंगापूर, कुवेत आणि यूएईचे संघ पात्रता एकमेकांना आव्हान देतील. अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, श्रीलंका आणि बांगलादेश हे पाच पूर्ण सदस्य संघ थेट प्रवेशासाठी पात्र आहेत.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.