December 5, 2022
infinix-smart-6

Infinix Smart 6 Plus स्मार्टफोन अखेर शुक्रवारी भारतात लॉंच झाला आहे. कंपनीच्या Infinix Smart 6 सीरिजच्या या नव्या व्हेरिएंटमध्ये ३ GB पर्यंत विस्तारित रॅम फीचर उपलब्ध आहे. याशिवाय Infinix च्या या नवीन फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा, MediaTek Helio G25 प्रोसेसर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. Infinix Smart 6 Plus ला एक मोठी स्क्रीन देखील मिळते. या लेटेस्ट Infinix स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स बद्दल आम्ही तुम्हाला सर्व काही सांगणार आहोत…

Infinix Smart 6 Plus price in India
Infinix Smart 6 Plus ची भारतात किंमत ७,९९९ रुपये आहे. हँडसेटची विक्री ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर उपलब्ध करून दिला जाईल. हा फोन क्रिस्टल वायलेट, सी ब्लू आणि मिरॅकल ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असेल.

आणखी वाचा : प्रतीक्षा संपली! ५० MP कॅमेरा असलेला Tecno Spark 9T भारतात लॉंच, किंमत १० हजारांपेक्षा कमी

Infinix Smart 6 Plus specifications
Infinix Smart 6 Plus स्मार्टफोनमध्ये ६.८२ इंचाचा ड्रॉप नॉच HD+ डिस्प्ले आहे. स्क्रीन-टू-बॉडी रेशो ९०.६ टक्के आहे. फोनमध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर आणि ३ GB रॅम आहे. स्मार्टफोनमधील रॅमही वाढवता येऊ शकते. कंपनीने फोनमध्ये एक्सटेंडेड रॅम फीचर दिले आहे, ज्याद्वारे युजर ३ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवू शकतील. म्हणजेच फोनमध्ये ६ जीबी पर्यंत रॅम उपलब्ध असेल. Smart 6 Plus Android 12 Go Edition आधारित XOS 10 सह येतो.

आणखी वाचा : ५० MP कॅमेरा असलेल्या Moto G32 स्मार्टफोनवरून अखेर पडदा उठला, जाणून घ्या किंमत आणि सर्व फीचर्स

Infinix च्या या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सेल प्रायमरी आणि AI डेप्थ सेन्सर आहे जो ड्युअल एलईडी फ्लॅशसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सेल सेन्सर आहे. फ्रंट कॅमेरासाठी ड्युअल एलईडी फ्लॅश देखील आहे.

Infinix Smart 6 Plus मध्ये ६४ GB इनबिल्ट स्टोरेज आहे जे microSD कार्डद्वारे ५१२ GB पर्यंत वाढवता येते. फोनला पॉवर देण्यासाठी ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. हँडसेटमध्ये सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे. Infinix च्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ आणि मायक्रो-USB पोर्ट आहे. याशिवाय, प्रॉक्सिमिटी सेन्सर, अॅम्बियंट लाइट सेन्सर आणि जी-सेन्सर देखील आहेत.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.