December 1, 2022
Viral Video

१५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासंदर्भातील जोरदार तयारी मागील काही दिवसांपासून सुरु आहे. यंदा भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन अगदी उत्साहाने साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने ‘आजादी का अमृत महोत्सव’ या अभियानाअंतर्गत वेगवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं असून १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्टदरम्यान हर घर तिरंगा मोहिम राबवली जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच सोशल मीडियावर स्वातंत्र्यदिनाचं सेलिब्रेशन सुरु झालं आहे. अशातच प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका यांनी ट्विटरवर शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला असून हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आणि डोळ्यात अश्रू येईतील हे नक्की.

नक्की वाचा >> विश्लेषण : ‘हर घर तिरंगा’ मोहीम आहे तरी काय? यामध्ये कसं सहभागी व्हायचं? यात सहभागी झाल्याचं प्रमाणपत्र कसं मिळतं?

सोशल मीडियावर फार सक्रीय असणाऱ्या गोयंका यांनी ट्विटरवरुन तीन रडणारे इमोजी, भारताचा झेंडा आणि सलाम करणारा इमोजी कॅप्शनमध्ये वापरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओवरील ओळींमध्ये, “तिरंग्यामध्ये पाच रंग असतात, शपथ घेऊन सांगतो की हृदयाला नाही तर तुमच्या आत्माला स्पर्श करून जाईल हा व्हिडीओ,” असं म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये एक शिक्षक विद्यार्थ्यांना तिरंग्यातील रंगांबद्दल फळ्यावर चित्र काढून माहिती देताना तिरंग्यात किती रंग असतात असं विचारलं. त्यावर सर्व मुलं तीन सांगतात. मात्र एक मुलगा पाच असं उत्तर देतो. या उत्तरानंतर शिक्षक त्या मुलाला जागेवर उभं करतात.

शिक्षक या मुलाला कान पकडून बेंचवर उभं राहण्यास सांगतात. यानंतर ते या मुलाला पाच रंग कोणते ते सांगण्यास सांगतात. यावर तो मुलगा केशरी, पांढरा, हिरवा आणि अशोकचक्राचा निळा असं उत्तर देतो. त्यानंतर हे शिक्षक पाचवा रंग कोणता असं विचारतात. त्यावर हा मुलगा जे उत्तर देतो ते ऐकून शिक्षकांच्या डोळ्यातही पाणी येतं.

नक्की वाचा >> विश्लेषण : भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांनी १५ ऑगस्टचीच निवड का केली? जाणून घ्या यामागील महत्त्वाचं कारण

“हे तर चारच झाले पाचवा रंग कोणता?” असं शिक्षक विचारतात. यावर कान पकडून बेंचवर उभा असणारा मुलगा, “पाचवा रंग म्हणजे तो लाल रंगाचा डाग आहे,” असं म्हणतो. “सर जेव्हा मी माझ्या वडिलांना शेवटचं पाहिलं होतं तेव्हा त्यांचा देह तिरंग्यामध्ये गुंडळालेला होता. त्यावेळी त्या तिरंग्यावर लाल रंगाचा डागही होता. हाच झेंड्याचा पाचवा रंग आहे,” असं हा विद्यार्थी शिक्षकाला सांगतो. हे उत्तर ऐकून शिक्षकाला काय बोलावं कळत नाही. शिक्षक विद्यार्थ्याला खाली बसायला सांगतात. डोळे पुसून दारात जाऊन उभे राहतात आणि शाळेच्या मैदानातील झेंड्याकडे पाहू लागतात.

या व्हिडीओच्या शेवटी, “लहु बिखरा पडा है शहीदों का हर कदम पे, खुद मिट जाते हैं लेकिन आंच नहीं आने देते वतन पे” असं वाक्य झेंड्याखाली झळकतं. काही तासांमध्ये या व्हिडीओला १ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले असून हे ट्विट व्हायरल झालं आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.