December 1, 2022
Disadvantages of using mobile phone after waking up in the morning

बहुतेक लोक सकाळी उठल्याबरोबर मोबाईल चेक करतात. हल्ली सगळ्यांनाच याची सवय लागली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की तुमची ही सवय तुमच्यासाठी मोठी समस्या बनू शकते. याचा तुमच्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो. मोबाइल वापरणे म्हणजे केवळ सोशल मीडियाच तपासणे नाही, तर अलार्म बंद करणे, वेळ तपासणे इत्यादी मार्गांनीही आपण मोबाइलचा वापर करतो. जर तुम्हालाही अशीच सवय असेल, तर तुमच्या आरोग्यावर त्याचा कशाप्रकारे परिणाम होतो ते जाणून घेऊया.

सकाळी मोबाईल वापरण्याचे तोटे

  • मूडवर परिणाम होतो

सकाळी उठल्यावर जेव्हा आपण मोबाइल पाहतो तेव्हा आपण, आपण काय चुकवले किंवा आज दिवसभरात काय करता येईल याचा विचार करतो. या गोष्टींचा तुमच्या मूडवर परिणाम होऊ शकतो.

Smartphone च्या अतिवापरामुळे वाढू शकतो Brain Tumor चा धोका; ‘या’ गोष्टीकडे करू नका दुर्लक्ष

  • तणाव वाढतो

सकाळी उठल्यावर लगेचच सोशल मीडियाचा वापर केल्याने तुमच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो. अनेक अहवालात सांगितले आहे की मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे नैराश्य येते.

  • वेळ आणि एकाग्रता खराब होते

जेव्हा तुम्ही उठल्यानंतर लगेच सोशल मीडिया, ईमेल किंवा मेसेजिंग तपासता, तेव्हा इतर लोकांच्या मतांचा तुमच्या विचारसरणीवर वाईट प्रभाव पडतो. तुमचा बराचसा वेळही यामुळे वाया जातो.

कशी करावी दिवसाची सुरवात?

  • दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा.
  • तुम्हाला तुमचा दिवस तणाव आणि चिंताविना सुरू करायचा असेल, तर झोपेतून उठल्यानंतर लगेच तुमचा स्मार्टफोन तपासणे थांबवा.
  • सकाळी उठल्याबरोबर पाणी प्या, ध्यान करा किंवा घरातील सदस्यांना गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा द्या. असे काही दिवस केल्याने तुम्हाला याची सवय होईल.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.