December 5, 2022
Ishaan Bhatnagar and Tanisha Crasto

तैपेई : भारताची प्रतिभावान बॅडिमटनपटू तनीषा क्रॅस्टोने तैपेई खुल्या स्पर्धेतील दमदार कामगिरी सुरू राखताना महिला आणि मिश्र दुहेरी गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. तसेच माजी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या पारूपल्ली कश्यपलाही आगेकूच करण्यात यश आले.

१९ वर्षीय तनीषाने इशान भटनागरच्या साथीने खेळताना मिश्र दुहेरी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत चायनिज तैपेईच्या चेंग काय वेन आणि वांग यु क्विओ जोडीवर २१-१४, २१-१७ अशी सरशी साधली. मग महिला दुहेरीत तनीषाने श्रुती मिश्राच्या साथीने तैपेईच्याच जिया यिन लिन आणि लिन यु-हाओ जोडीचा २१-१४, २१-८ असा पराभव केला.

दुसरीकडे, अनुभवी कश्यपने पुरुष एकेरीच्या सामन्यात तैपेईच्या चिआ हाओ ली याच्यावर २१-१०, २१-१९ अशी मात केली. मिथुन मंजुनाथन आणि किरण जॉर्ज यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले. मिथुनला चौथ्या मानांकित जपानच्या कोडाय नाराओकाने २४-२२, ५-२१, १७-२१ असे, तर किरणला चोउ टिन चेन याने २१-२३, २१-१६, ७-२१ असे पराभूत केले.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.