February 2, 2023
David Miller

दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू डेव्हिड मिलर सध्या भारत दौऱ्यावर आहे. त्यातच मिलरवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. डेव्हिड मिलरच्या मुलीचं निधन झालं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर त्यानं ही माहिती दिली आहे. त्यावर लिहलं की, “RIP माझी रॉकस्टार, माझ खूप सारं प्रेम.”

मिलरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो आपल्या मुलीसह दिसत आहे. मात्र, त्यातील काही फोटोंमध्ये मुलीच्या डोक्यावरील केस गेल्याचं पहायला मिळते. मिलरची मुलगी कॅन्सर या आजाराने त्रस्त असल्याचं सांगितलं जातं. पण, मिलरने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

हेही वाचा – सरचिटणीसाऐवजी मुख्य कार्यकारी अधिकारी निवडा!; ‘आयओसी’ची भारतीय ऑलिम्पिक संघटनेला अतिरिक्त सूचना

इन्स्टाग्राम स्टोरीवर मिलरने म्हटलं की, “माझी स्कट तुझी खूप आठवण येईल. तुझ्या आयुष्यात तू संघर्ष करत होती, तो संघर्षही तू सकारात्मकतेने पाहिला. आयुष्यातील प्रत्येक वळणावर तु खूप काही शिकवलं. खूप खूप प्रेम.”

दरम्यान, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये डेव्हिड मिलरने चमकदार कामगिरी केली आहे. दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताविरोधात डेव्हिडने नाबाद १०६ धावांची खेळी केली होती. तर, पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद ७५ धावा काढत आफ्रिकेला विजय मिळवून दिला होता.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.