February 3, 2023
Ias officer Awanish Sharan shares video of blogger who helped 75 year old rag picker to start new bussiness


‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे…’ या कवी विंदा करंदीकरांच्या ओळींची आठवण करून देणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. म्हातारपण म्हणजे आयुष्यभर सतत कामात व्यस्त असणाऱ्या शरीराला थोडा आराम देण्याची वेळ. कारण या वयात शरीराची काम करण्याची क्षमता कमी होते. आयुष्यभर कष्ट करून जेव्हा शरीर थकून जाते, तेव्हा आपल्या कुटुंबियांनी, मुलांनी आपली काळजी घ्यावी आणि आपल्याला सांभाळावे ही अपेक्षा असते. पण प्रत्येकासाठी आयुष्य इतके सोपे नसते. अनेक गरीब निराधार व्यक्तींना म्हातारपणी देखील उदरनिर्वाहासाठी कष्ट करावे लागतात. अशाच एका निराधार गरीब आजींचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. याचे कारण म्हणजे या आजींनी एका ब्लॉगरच्या मदतीने वयाच्या ७५ व्या वर्षी नवा व्यवसाय सुरू केला आहे. मदत करणाऱ्या या व्यक्तिवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असणारे अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरूवातीला एक आजी कचरा गोळा करताना दिसत आहेत, त्यांना याचे कारण विचारताच “हे विकून यातून पैसे मिळतात” असे उत्तर त्या देतात. ब्लॉगर तरुन मिश्राने या आजींची विचारपूस करत त्यांची मदत करण्याचे ठरवले. आजींना सोबत नेऊन त्याने नव्या व्यवसायासाठी लागणारे सर्व सामान विकत घेतल्याचे दिसत आहे. इतकेच नाही तर ते सामान आणून भाजी विकण्याच्या या व्यवसायाचे उद्घाटन केल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी या आजी तरुनच्या डोक्यावर हात ठेवत त्याला आशीर्वाद देताना दिसत आहेत. पाहा हा व्हायरल व्हिडीओ.

CCTV : हातात शस्त्र घेऊन बँकेत घुसलेल्या चोराला महिलेने असा शिकवला धडा; Viral Video एकदा पाहाच

अवनीश शरण यांनी शेअर केलेला व्हिडीओ :

या व्हिडीओवर नेतकऱ्यांकडुन कौतुकाचा वर्षाव होत असून, तरुनच्या मदतीमुळे समाजातील गरजुंना मदत करण्याची अनेकांना प्रेरणा मिळेल असा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.