February 4, 2023
Dog-Horse-Video-Viral

सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ नेटकऱ्यांचंही भरपूर मनोरंजन करतात. हे व्हिडीओ इतके रंजक असतात की ते पाहून कोणाचाही दिवस चांगला जातो. प्राण्यांचे व्हिडीओ तसंही अनेकांचं मन जिंकून घेतात. मात्र, सध्या जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो जास्तच खास आहे. कारण या व्हिडीओमध्ये एक कुत्रा एका घोड्याच्या पाठीवर बसून सवारी करत असल्याचं दिसून आला. हे वाचून तुम्हालाही विश्वास बसला नसेल मात्र याचा व्हिडीओही समोर आला आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर मात्र एक छोटीशी स्माईल आल्याशिवाय राहणार नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसून येतं, की एका पांढऱ्या रंगाच्या घोड्याच्या अंगावर कुत्रा अगदी ऐटीत बसलेला आहे. घोडा धावत असताना तो घट्ट पकडून बसलेला आहे जेणेकरून तो खाली पडणार नाही. तर, दुसरीकडे घोडा मात्र न थकता धावताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही अवाक झाले आहेत. घोड्यावर बसल्यानंतर या कुत्र्याचा शाही अंदाज लोकांना खूप आवडू लागलाय. या व्हिडीओमधल्या घोड्याने पुढे जे केलं ते पाहून रस्त्यावरील वाहनांच्या नियमांना धाब्यावर बसवणाऱ्या सर्वांच्या डोळ्यात अंजन घातलंय. रस्त्यावर धावत असताना ट्रॅफिक लाईट पाहून घोडा तिथेच थांबतो आणि वाहतुकीचे नियम पाळतो. जर प्राण्यांना वाहतूकीचे नियम समजतात आणि ते पाळतात सुद्धा…मग माणसाकडे तर बुद्धी असूनही अनेकदा नियम सर्रासपणे तोडतात. त्यामुळे माणसांनी या घोड्याकडून धडा घेणं गरजेचं आहे.

आणखी वाचा : VIRAL : ५० वर्षांच्या मेहनतीने मिळवलेली ६०० कोटींची संपत्ती गरीबांना केली दान, राहण्यासाठी फक्त घर उरले

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : रेल्वे रूळ ओलांडताना धाड्धाड् ट्रेन नव्हे मृत्यूच येत होता! अंगावर काटा आणणारा VIRAL VIDEO पाहाच

या व्हिडीओ नेमका कुठचा आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तरीही लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. यावर लोकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, इथे काय चालले आहे ते मला समजत नाही, परंतु मला ते आवडलंय. दुसरीकडे, दुसर्‍या युजरने कमेंट करत लिहिलं आहे की, हे दृश्य पाहून मला असं का वाटलं की हा अॅनिमेटेड चित्रपटाचा सीन आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.