January 27, 2023
nana patole cherrapunji viral video


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा चेरापुंजीमधील एक कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा माझ्या बदनामीचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केलाय. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटरवरुन नाना पटोलेंचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ शेअर करत नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांनी हा व्हिडीओ पाहून धक्का बसल्याचं सांगतानाच नानांनी याबद्दल उत्तर द्यावं अशी मागणी केली. याच आरोपांवरुन नाना पटोलेंनी स्पष्टीकरण देताना हा लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं असून कायदेशीर मार्गेने उत्तर देऊ असं सांगितलंय.

नक्की पाहा >> Photos: “उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या आदेशानेच पवारांवर पातळी सोडून टीका”; बापाचा उल्लेख करत अजित पवारांनी इशारा दिलेल्या नेत्याचा गौप्यस्फोट

चित्रा वाघ काय म्हणाल्या?
मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये चित्रा वाघ यांनी, “नाना पटोलेंचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मला धक्काच बसला. ‘अशा’ पीडितांनी समोर यावं योग्य ती कारवाई होईल,” असं म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना, “सकाळपासून हा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नाना पटोले एका महिलेसोबत आहेत. जोपर्यंत सार्वजनिक जीवनामध्ये एखादी गोष्ट येत नाही ती खासगी असते. मात्र जेव्हा ती सार्वजनिक जीवनामध्ये येते तेव्हा लोकप्रितिनिधी म्हणून त्यांना विचारलं पाहिजे. त्यानुसार मी विचारलंय ट्वीट करुन त्यांना, “काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलातं” या कॅप्शनसहीत हा काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल या गाण्यासहीत एडीटींग केलेला व्हिडीओ ट्वीट केला.

नक्की वाचा >> “…त्या दिवशी भाजपा बंडखोरांना बाजूला करेल”; शिंदे गटासंदर्भात उद्धव ठाकरेंचं भाकित

काय आहे व्हिडीओत?
या व्हिडीओच्या सुरुवातीला रोमान्स इन चेरापुंजी, मेघालय असं लिहिण्यात आलं असून एक व्यक्ती एका महिलेच्या गळ्यात हात घालून बसल्याचं दिसत आहे. याच फ्रेममध्ये व्हिडीओत “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, काय आ***, नाना एकदम ओके” असा मजकूर लिहिण्यात आलाय. यात खुर्चीवर महिलेच्या खांद्यावर हात ठेऊन बसलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाहीत. त्या महिलेचाही चेहरा दिसत नाहीय. मात्र पुढच्या फ्रेममध्ये त्या व्यक्तीने जे टीशर्ट घातलं आहे त्याच पद्धतीच्या आणि रंगाच्या टीशर्टमध्ये नाना पटोले अगदी पाश्चिमात्य पेरहावामध्ये दिसत आहेत. व्हिडीओच्या शेवटी हे फोटो पोलो ऑर्कीड हॉटेलमधील असल्याचा दावा फोटोंसहीत करण्यात आलाय.

नक्की वाचा >> “जसं काही त्यांचं…”; नातवाचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवरुन उद्धव ठाकरेंना टोला

याच व्हिडीओच्या आधारे चित्रा वाघ यांनी “व्हिडीओत नाना पटोले महिलेसोबत दिसत आहेत,” असं पत्रकार परिषदेत म्हटलंय.

नाना पटोले काय म्हणाले?
चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पटोलेंनी, “हे सगळं प्रकरण आमचं मिडीया सेल बघतय मी सध्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहे. आपल्या देशात राजकारणाची पातळी खाली उतरलेली दिसतेय त्याचा हा परिणाम आहे. लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना कसं बदनाम करता येईल असे प्रयत्न सुरु आहेत. यासंदर्भात आमची लीगल टीम कारवाई करत आहे. त्यांच्याबद्दल (चित्रा वाघ यांच्याबद्दल) मला काही बोलायचं नाहीय. खरं काय ते समोर येईल,” असं म्हटलंय.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.