December 5, 2022
Panda-Caretaker-Video-Viral

निसर्गातले असंख्य जाती-प्रजातींचे प्राणी-पक्षी खूपच क्युट असतात. त्यांचं दिसणं, चालणं, आवाज, ते करत असलेल्या विविध कृती हे सगळं अतिशय आकर्षक असतं. त्यातलाच एक प्राणी म्हणजे पांडा. हे पांडा दिसायला अतिशय निरागस आणि गोड असतात. कुणाचंही लक्ष सहज त्यांच्याकडे वेधलं जातं. पांडा अगदीच लहान मुलांसारखं काय-काय गंमतीदार करत असतात. सोशल मीडियावर बऱ्याचदा पांडाजचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. पण तुम्हाला पांडा कितीही अवडत असला तरी त्याला सांभाळणं हे काही खायचं काम नाही. पांडाची मस्ती, त्याची धडपड, त्यांच्यासोबत राहणं हे खूपच जिकरीचं काम असतं. यावर तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. पण हे खरंय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गार्डन परिसरात चार गुबगुबीत पांडा अगदी लहान मुलांसारखे खेळत आहेत. कुणी खांबावर रांगत तर कुणी एकमेकांसोबत जमिनीवर लोळून खेळत आहेत. एक पांडा तर गार्डन परिसरात काम करत असलेल्या केअरटेकरच्या पाठीवर बिलगून त्याच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. त्या केअरटेकरच्या पाठीवर बसून हा पांडा कधी त्याच्या केसांशी खेळतोय तर कधी त्याच्या कमरेला बिलगून तो रांगताना दिसतो. हा पांडा केअरटेकरला काम करत करू देत नाही, पण मस्ती करून या केअरटेकरला पार वैताग आणून सोडतो. हे पाहून मग बाकीचे तीन पांडासुद्धा त्याच्या मस्तीत सामील होतात आणि केअरटेकरशी मस्ती करू लागतात. हा बिचारा केअरटेकर या चारही पांडाना कसं सहन करतोय, हे आपण व्हिडीओमध्ये पाहू शकतो.

आणखी वाचा : Viral Video : धनुषच्या ‘Rowdy Baby’ गाण्यावर ‘या’ अमेरिकन पठ्ठ्यानं केला जबरदस्त डान्स, आयकॉनिक स्टेप्स पाहून थक्क व्हा

व्हिडीओमध्ये सर्व पांडा ज्याप्रमाणे खेळताना आणि दंगा मस्ती करताना दिसत आहेत, हे पाहून तुम्ही कोणत्याही मूडमध्ये असलात तरी चेहऱ्यावर एक गोड स्माईल आल्याशिवाय राहणार नाही. पांडांची निरागसता आणि भोळेपणा पाहून तुम्ही काही वेळासाठी सर्व चिंता विसरून जाल. या पांडांसारखेच आपणही लहान होऊन आयुष्य जगलं पाहिजे, असं वाटू लागतं. पण केअरटेकरसोबत त्यांची ही मस्ती पाहून तुमच्या कपाळावर आट्या येतील, हे मात्र नक्की.

आणखी वाचा : Chinese Rocket Debris : चीनने सोडलेलं ‘ते’ रॉकेट भारतात ‘या’ ठिकाणी कोसळलं, पाहून लोकांना घाम फुटला!, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना रस्ता ओलांडण्यास मदत करणारा हा कुत्रा रातोरात स्टार बनला, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ Andrew__elmowaf नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ७ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २ लाख २८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत. अनेक युजर्सनी केअरटेकरच्या सहनशीलतेचं कौतुक देखील केलंय.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.