December 5, 2022
Recover deleted photos from phone? Follow these tips

मोबाईल फोन आता फक्त कॉल करणे आणि बोलणे एवढ्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. काळाच्या ओघात स्मार्टफोनच्या वाढत्या तंत्रज्ञानाने फोन प्रोफेशनल कॅमेरासारखा बनवला आहे. ५०एमपी, ६४एमपी आणि १०८एमपीचे कॅमेरे मोबाइल फोनमध्ये येऊ लागले आहेत जे उत्कृष्ट दर्जाचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करतात. या आठवणी आणि कॅमेऱ्यात टिपलेले क्षण आपण आपल्या स्मार्टफोन गॅलरीत सेव्ह करतो जे आपल्यासाठी खूप खास असतात. पण अनेकदा फोन गॅलरीत सेव्ह केलेले हे फोटो चुकून डिलीट होतात. आपल्याला आवडत असलेला फोटोच आपल्या हातून नकळत डिलीट होतो. त्यानंतर खूप वाईट वाटत. तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल आणि तुम्ही देखील तुमचा आवडता फोटो चुकून डिलीट केला असेल तर आता काळजी करण्याचे कारण नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि अगदी सोप्या टिप्स वापरुन डिलीट केलेला फोटो स्मार्टफोनमधून कसा रिकव्हर करता येईल. जाणून घ्या.

डिलीट झालेले फोटो पुन्हा कसे मिळवायचे?

अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये फोनवरून हटवलेले फोटो रिकव्हर करणे खूप सोपे आहे. गूगलने बनवलेली ही ऑपरेटिंग सिस्टीम चालवणार्‍या मोबाईल फोन्सनी प्री-लोड केलेले ट्रॅश फोल्डर प्रदान करणे सुरू केले आहे. ज्याला Recently Deleted, Recycle Bin, Trash Bin देखील म्हणतात. हे फीचर अँड्रॉइड फोनच्या फोटो गॅलरी ॲपमध्ये समाविष्ट केले आहे, ज्याचे काम मुख्य फोल्डरमधून डिलीट झालेले फोटो सांभाळून ठेवणे आहे. तुमच्याकडूनही एखादा फोटो चुकून डिलीट झाला असेल, तर हा फोटो गॅलरीतून बाहेर येऊन ट्रॅश बिन फोल्डरमध्ये येतो. गॅलरीच्या ट्रॅश फोल्डरमधून फोटो पुनर्प्राप्त करण्यासाठी, खाली नमूद केलेल्या टिप्सचेअनुसरण करा

( हे ही वाचा: पेटीएम घेतंय मोबाईल रिचार्जवर पैसे ; जाणून घ्या कोणते ॲप देत आहेत मोफत सेवा)

  • तुमच्या अँन्ड्रॉईड स्मार्टफोनवर गॅलरी ॲप उघडा.
  • फोटो गॅलरी खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला हे ट्रॅश फोल्डर दिसेल.
  • फोटो गॅलरी व्यतिरिक्त, आपण थेट फोन मेनूमध्ये हटविलेले, बिन किंवा ट्रॅश हे शब्द शोधून ते फोल्डर देखील उघडू शकता.
  • तुम्ही ट्रॅश फोल्डर उघडताच, तुम्हाला त्यामधील सर्व फोटो दिसतील जे फोनवरून पूर्वी डिलीट झाले आहेत.
  • फोल्डरमधील फोटोंमधून तुम्हाला एखादा फोटो पुन्हा परत मिळवायचा असेल तर फोटो निवडा आणि रिकव्हर बटण दाबा.

येथे हे लक्षात घ्यावे लागेल की सरासरी, मागील ३० दिवसांत हटविलेले सर्व फोटो या ट्रॅश फोल्डरमध्ये जतन केले जातात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला परत मिळवायचा असलेला फोटो डिलीट होऊन बराच वेळ झाला असेल, तर कदाचित तो फोटो या फोल्डरमध्ये सापडणार नाही. दुसरीकडे, तुम्हाला एखादा फोटो सापडल्यास, तो पुनर्प्राप्त केल्यानंतर, तो फोटो त्याच फोल्डरमध्ये परत जाईल जिथे तो डिलीट करण्यापूर्वी जतन केला होता. म्हणजेच, कॅमेरा, स्क्रीनशॉट आणि व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटच्या फोल्डरमध्ये तो फोटो त्याच्या श्रेणीनुसार रिकव्हर केला जाईल. तिथे जाऊन तुम्ही फोटो पाहू शकता.

गुगल फोटोंमधून पुनर्प्राप्त करा

अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये थेट गूगलच्या वर्चूअल्स मेमरीमध्ये फोटो सेव्ह करण्याचा पर्याय देखील आहे. दुसरीकडे, असे स्मार्टफोन जे pure stock Android आवृत्तीवर चालतात, त्यामध्ये डिफॉल्ट गॅलरी ॲपच्या रूपात गुगल फोटोज दिले जातात. नोकिया, मोटोरोला आणि मायक्रोमॅक्स या ब्रँडच्या स्मार्टफोनमध्येही हेच दिसून येते. तुमच्या फोनमध्ये Google Photos असल्यास, खालील चरणांसह तुम्ही हटवलेले फोटो रिकव्हर करू शकता.

( हे ही वाचा: Jio Number पोस्टपेड वरून प्रीपेड मध्ये रूपांतरित करायचाय? जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग)

  • सर्वप्रथम तुमच्या फोनवर Google Photos उघडा.
  • Google Photos मध्ये ‘Library’ चा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.
  • लायब्ररी उघडल्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे फोल्डर्स सापडतील, त्यापैकी ‘बिन’ फोल्डर शोधा आणि उघडा.
  • बिन फोल्डरमध्ये ते सर्व फोटो देखील दाखवले जातील जे तुमच्या गॅलरीतून डिलीट झाले आहेत आहेत. जो फोटो पुनर्प्राप्त करायचा आहे त्याला येथे शोधा.
  • फोटो निवडल्यानंतर Restore चा पर्याय दाबा. सर्व फोटो परत केले जातील.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.