February 3, 2023
smartphone care tricks

मोबाईल हे आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचे उपकरण आहे. आपण अनेक कामं मोबाईलमुळे सहजरित्या करू शकतो. इतर उपकरणांप्रमाणे आपला मोबाईल देखील लेटेस्ट असावा असे अनेकांना वाटते, कारण त्यामुळे लेटेस्ट फीचर्स वापरता येतात. तर काही जणांसाठी लेटेस्ट फोन वापरणे हा ‘स्टेटस’चा भाग असतो. त्यामुळे एखादा नवा मोबाईल लाँच झाला की लगेच तो खरेदी करण्याची तयारी सुरू होते. खूप पैसे खर्च करून महागडे फोन विकत घेतले जातात, पण त्याची नीट काळजी घेतली नाही तर हे फोन काही वेळाने जुने दिसू लागतात. यावर काय उपाय करता येईल हे बऱ्याच जणांना माहित नसते. फोन नेहमी नव्यासारखा दिसावा यासाठी तुम्ही काही ट्रिक्स वापरू शकता, कोणत्या आहेत या ट्रिक्स जाणून घ्या.

स्क्रिन प्रोटेक्टर
नवा फोन विकत घेतल्यानंतर त्यावर स्किन प्रोटेक्टर लावण्याचा सल्ला दिला जातो. या स्किन प्रोटेक्टरमुळे फोनला एक्स्ट्रा लेयरचे प्रोटेक्शन मिळते आणि त्यामुळे डिस्प्ले सुरक्षित राहतो.

आणखी वाचा : तुमचा फोन सतत ट्रॅक होतोय का? यापासून सुटका मिळवण्यासाठी गूगल क्रोममध्ये करा ‘हा’ बदल

ग्रीप्स
फोन वापरताना दीर्घकाळ नीट काम करण्यासाठी तसेच नवा दिसण्यासाठी त्याची काळजी घेणे आवश्यक असते. आजकाल दिवसभर मोबाईल आपल्या हातातच असतो. त्यामुळे इतर कामं करताना मोबाईल पडुन खराब होण्याची शक्यता असते. म्हणुन मोबाईल वापरण्यासाठी ग्रीप्सचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. ग्रीप्समध्ये पॉप सॉकेट, रिंग होल्डर्स असे प्रकार उपलब्ध आहेत. ग्रीप्सचा वापर केल्याने मोबाईल पकडणे सोप्पे होते.

फोन होल्डर
प्रवासादरम्यान फोनची काळजी घेणे कठीण असते, अशावेळी कारमधून प्रवास करताना तुम्ही फोन होल्डरचा वापर करू शकता. यास डॅशबोर्डवर सहजरित्या फिट करता येते. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर वेगवेगळ्या किंमतीचे आणि ब्रँडचे फोन होल्डर उपलब्ध आहेत.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.