December 5, 2022
Indian-origin Rishi Sunak uk PM race

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारणाऱ्या दोन अंतिम स्पर्धकांपैकी एक आहेत. त्यांनी सोमवारी सांगितले की, त्याच्या केलेल्या कष्ट आणि त्यागामुळे त्यांना चांगले भविष्य मिळाले. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले यूकेचे परराष्ट्र सचिव लिझ ट्रस यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान ऋषी सुनक म्हणाले, “माझ्या आई-वडिलांच्या त्याग आणि प्रेमामुळे मी येथे उभा आहे. त्यांच्या मुलांना चांगले भविष्य मिळावे यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केले, बचत केली आणि त्याग केला,”

याच चर्चेदरम्यान त्यांनी एक खुलासा केला आहे. ऋषी सुनक यांनी कॅलिफोर्नियातील ऑक्सफर्ड आणि नंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रगती करण्यापूर्वी स्थानिक भारतीय रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम केले होते. ४२ वर्षीय माजी कुलपती, ऋषी सुनक यांनी ६० वर्षांपूर्वी युनायटेड किंगडममध्ये स्थलांतरित झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला कराव्या लागलेल्या संघर्षाबद्दल सांगितले. त्यांचे वडील दक्षिणेकडील साउथॅम्प्टनमध्ये फॅमिली डॉक्टर तर त्यांच्या आई स्थानिक फार्मसी चालवत होत्या.

‘तू आयुष्यात काहीही करू शकणार नाही’ असे म्हणणाऱ्या शिक्षिकेला विद्यार्थिनीने दिले चोख उत्तर; सोशल मीडियावर पोस्ट Viral

ते म्हणाले, “माझे कुटुंब ६० वर्षांपूर्वी येथे स्थलांतरित झाले. माझी आई साउथहॅम्प्टन येथे स्थानिक केमिस्ट चालवत होती. तिथेच मी औषधे विकत मोठा झालो. मी रस्त्याच्या कडेला असलेल्या भारतीय रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणूनही काम केले आहे. माझ्या आई-वडिलांचे प्रेम, मेहनत, त्याग आणि त्यांनी मला दिलेल्या संधींमुळे मी येथे उभा आहे आणि म्हणूनच मला पंतप्रधान व्हायचे आहे.”

सुनक यांनी त्यांच्या आयुष्यात कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे जन्मस्थान असलेल्या ग्रँथममधील हाय-व्होल्टेज कार्यक्रमामध्ये ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींसह सामील झाले होते. तेव्हा ते म्हणाले होते, “कुटुंब म्हणजे माझ्यासाठी सर्व काही. माझ्या कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्याबद्दल कृतज्ञ आहे.”

इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती यांचे पती म्हणूनही ऋषी सुनक यांना भारतात ओळखले जाते.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.