December 5, 2022
Bear Grylls

लोकप्रिय टीव्ही मालिका ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ फेम सर्व्हायव्हल एक्सपर्ट बेअर ग्रिल्स भारतामध्ये प्रचंड प्रसिद्ध झाला आहे. ४८ वर्षीय ग्रिल्सने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुपरस्टार रजनीकांत, अभिनेता रणवीर सिंग आणि अक्षय कुमार यांच्यासोबत जंगलात राहण्याचा अनुभव घेतला आहे. आता त्याला भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीसोबत असे साहस करण्याची इच्छा आहे.

ग्रिल्स आता भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला त्याच्या प्रसिद्ध शो ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’मध्ये होस्ट करण्यासाठी सज्ज झाला आहे. रविवारी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना, त्याने विराट कोहलीसोबत जंगलांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. “धाडसी स्वभावाच्या विराट कोहलीसोबत साहस करणे खूप चांगला अनुभव असेल,” असेही ग्रिल्स म्हणाला.

हेही वाचा – युझवेंद्र चहलचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक! पत्नी आणि सहकाऱ्यांसोबतचे चॅट लिक

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली जागतिक स्तरावरील प्रसिद्ध खेळाडू आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर २० कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यामुळे ग्रिल्सला आता त्याच्यासोबत जंगलांमध्ये भटकण्याची इच्छा आहे. मात्र, कोहली बीसीसीआयचा करारबद्ध खेळाडू असल्याने त्याला परवानगी दिली जाईल का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मंडळाच्या नियमानुसार दुखापती टाळण्यासाठी तो साहसी खेळांमध्ये भाग घेऊ शकत नाही.

विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलीसोबत त्याने लंडन आणि पॅरिसमध्ये सुट्टी घालवण्यास सुरुवात केली आहे. सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातूनही कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. या महिन्याच्या अखेरीस आशिया चषकादरम्यान तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.