December 1, 2022
Nothing Phone (1) pre-booking starts again in India

नथिंग फोन (१) पहिल्या प्री-ऑर्डर विक्रीदरम्यान काही मिनिटांतच आऊट ऑफ स्टॉक झाला. दुर्दैवाने, अनेक इच्छुक ग्राहक फोन प्री-बुक करू शकले नाहीत. यामुळे त्यांची निराशा झाली. मात्र अशा ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नथिंग इंडियाचे अध्यक्ष आणि महाव्यवस्थापक मनु शर्मा यांनी आज, १८ जुलै रोजी प्री-ऑर्डर विक्रीची दुसरी फेरी आयोजित करण्याची घोषणा केली आहे.

शर्मा यांनी दुसऱ्या प्री-ऑर्डर विक्रीची घोषणा ट्विटरवर केली आहे. इच्छुक ग्राहकांसाठी आज दुपारी १२ वाजल्यापासून नथिंग फोन (१) ची बुकिंग सुरु झाली आहे. नथिंग फोन (१) ची बुकींग करताना घाई करणे आवश्यक आहे कारण उशीर होऊ शकतो आणि स्टॉक काही मिनिटांतच संपू शकतो. आता, प्री-ऑर्डर विक्रीचा कालावधी २० जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आला आहे.

वेबसाइट खरी आहे की बनावट हे ओळखणे झाले सोपे; मिनिटांमध्ये कळणार सत्यता

नथिंग फोन (१) तीन प्रकारांमध्ये येतो. बेस मॉडेल ८जीबी रॅम आणि १२८जीबी अंतर्गत स्टोरेजसह ३२,९९९ रुपयांच्या किंमतीत येते. दुसरे मॉडेल ८जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेजसह ३५,९९९ रुपयांच्या किंमतीत येते. शेवटी, फोनचे तिसरे आणि टॉप-एंड मॉडेल १२जीबी रॅम आणि २५६जीबी अंतर्गत स्टोरेजसह पॅक केले आहे आणि त्याची किंमत ३८,९९९ रुपये आहे.

नथिंग आणि फ्लिपकार्ट विशेष किंमतीमध्ये नथिंग फोन (१) ऑफर करत आहेत. फोन प्री-बुक करणार्‍या ग्राहकांना नथिंग फोन (१) रु. ३१,९९९ च्या सुरुवातीच्या किमतीत मिळेल. ही किंमत ८जीबी रॅम + १२८जीबी स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलसाठी आहे. इतर दोन मॉडेल ८जीबी/२५६जीबी आणि १२जीबी/२५६जीबी अनुक्रमे ३४,९९९ रुपये आणि ३७,९९९ रुपयांच्या कमी किमतीत उपलब्ध असतील. याव्यतिरिक्त, खरेदीदारांना एक हजार रुपयांची झटपट सूट मिळू शकेल, ज्यामुळे किंमत आणखी कमी होईल.

नथिंग फोन १ स्मार्टफोन अँड्रॉइड १२ आधारित नथिंगओएससह येतो. कंपनीने आश्वासन दिले आहे की फोनला ३ वर्षांसाठी सिस्टम अपडेट आणि ४ वर्षांसाठी दर दोन महिन्यांनी सिक्युरिटी पॅच अपडेट मिळतील. डिव्हाईस जवळपास-स्टॉक अँड्रॉइड १२ चा अनुभव देतो. नथिंगचे सॉफ्टवेअर आणि अद्वितीय हार्डवेअरसह, हा फोन इतरांपेक्षा वेगळा आहे.

आपला पर्सनल डेटा लीक होण्यापासून कसा वाचवायचा? जाणून घ्या सोप्या टिप्स

नथिंग फोन १ हा फोन १२०Hz च्या रीफ्रेश रेटसह ६.५५ इंच फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेसह येतो. नथिंग फोन (१) मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो ५० मेगापिक्सलच्या दोन सेन्सर्सने सुसज्ज आहे. प्रायमरी सेन्सर ओआयएस म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करतो. सेकेंडरी कॅमेरा अल्ट्रावाइड सेन्सर आणि मॅक्रो कॅमेरा म्हणून काम करतो.

नथिंग फोन (१) ला ४५०० एमएएच बॅटरीचा सपोर्ट आहे जो ३३ वॉट वायर्ड चार्जिंग, १५ वॉट वायरलेस चार्जिंग आणि ५ वॉट रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. मात्र, या फोनचा चार्जिंगचा स्पीड इतर स्मार्टफोनच्या तुलनेत कमी आहे आणि कंपनीने बॉक्समध्ये चार्जरही दिलेला नाही. युजर्सना या फोनसाठी स्वतंत्रपणे वायर्ड किंवा वायरलेस चार्जर खरेदी करावा लागेल. चार्जरची किंमत २,४९९ रुपये आहे.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.