December 1, 2022
sp shay hope

पोर्ट ऑफ स्पेन : सलामीवीर शे होपने (११५ धावा) साकारलेल्या शतकामुळे यजमान वेस्ट इंडिजने रविवारी भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३११ अशी भक्कम धावसंख्या उभारली. धावांचा पाठलाग करताना पहिला सामना गमावणाऱ्या विंडीजने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. एकदिवसीय कारकीर्दीतील १००वा सामना खेळणारा होप आणि कायले मेयर्स (२३ चेडूंत ३९) यांनी ९.१ षटकांतच ६५ धावांची सलामी दिली. मेयर्सला फिरकीपटू दीपक हुडाने माघारी पाठवले. मग होपला शमार ब्रूक्स (३६ चेंडूंत ३५) आणि कर्णधार निकोलस पूरन

(७७ चेंडूंत ७४) यांनी तोलामोलाची साथ लाभली. होपने १३५ चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या साहाय्याने ११५ धावा केल्या. हे त्याचे एकदिवसीय कारकीर्दीतील १३वे, तर भारताविरुद्धचे चौथे शतक होते. भारताकडून शार्दूल ठाकूर (३/५४), अक्षर पटेल (१/४०), हुडा (१/४२) आणि यजुर्वेद्र चहल (१/६९) यांनी बळी मिळवले.

भारताला दंड

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात षटकांची गती धिमी राखल्यामुळे भारताला दंड ठोठावण्यात आला आहे. खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनापैकी २० टक्के रकमेचा हा दंड आहे. निर्धारित ५० षटके पूर्ण करण्यासाठी दिलेल्या वेळेत शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एक षटक कमी टाकले होते. त्यामुळे सामनाधिकारी रिची रिचर्ड्सन यांनी भारतीय संघावर दंडात्मक कारवाई केली.

  • एकदिवसीय कारकीर्दीतील १००व्या सामन्यात शतक झळकावणारा होप हा जागतिक क्रिकेटमधील १०वा फलंदाज ठरला.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.