December 5, 2022
condom

Consent म्हणजेच समंती, या एका मुद्द्यावरून आजवर अनेक कोर्ट खटले, चित्रपट, अगदी आंदोलने सुद्धा झाली आहेत. स्त्रीच्या मर्जीविरुद्ध पुरुषाने संबंध ठेवण्यास केलेली जबरदस्ती हा विषय आजवर अनेक गुन्ह्यांच्या मागचं गंभीर कारण ठरला आहे. मात्र अलीकडेच समोर आलेली एक घटना या सर्व चर्चांना छेद देणारी आहे. एका महिलेने आपल्या पार्टनरसोबत सेक्स करताना मुद्दाम कंडोमला सुईने छिद्र पाडल्याचा धक्कादायक प्रकार सध्या चर्चेत आहे. या प्रकारणांनंतर संबंधित पुरुषाने थेट कोर्टाची पायरी गाठली असून या महिलेले न्यायालयाने सहा महिन्यांची कोठडी सुनावली आहे. स्टिल्थइंग (Stealthing) या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली असून निकाल देताना न्यायाधीशांनी सुद्धा पहिल्यांदाच अशा प्रकारची सुनावणी करत असल्याचे म्हंटले.

प्राप्त माहितीनुसार, सदर महिला ही ईस्ट जर्मनीची रहिवाशी असून मागील वर्षभर तिचे या पीडित पुरुषासोबत संबंध होते. पुरुषाने न्यायालयात सांगितल्याप्रमाणे या महिलेला त्याच्याविषयी प्रेमाची भावना होती मात्र आपल्याला असे वाटत नसल्याचे पुरुषाने सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. यानंतर दोघांनी सहमतीने फ्रेंड्स विथ बेनिफिट्स म्हणजे ज्यात केवळ शारीरिक संबंध असतात मात्र प्रेम किंवा नाते नसते, अशा नावाने राहण्याचा निर्णय घेतला. ही महिला ३९ वर्षीय असून पुरुषाचे वय ४२ आहे.

तरुणाने गिळली चक्क 63 नाणी, 2 दिवस पार पडली शस्त्रक्रिया, कारण ऐकाल तर व्हाल थक्क

काही दिवसांपूर्वी सेक्स दरम्यान या महिलेने पार्टनरच्या नकळत कंडोमला छिद्र पाडले. आपल्याला आई व्हायचे असल्याने असे पाऊल उचलल्याची माहिती महिलेने न्यायालयाला दिली. या प्रकरणी काही दिवसांनी महिलेने स्वतः आपल्या पार्टनरला मॅसेज करून आपण कंडोमला छिद्र पाडल्याची कबुली देत आपण गर्भवती असल्याचे सांगितले. वास्तविक ही महिला तेव्हा गर्भवती नव्हतीच. या खोट्या कारणाने तरी आपल्याला या पुरुषासोबत राहता येईल अशी भावना या घटनेचे स्रोत असेल असा अंदाज कोर्टाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, मेसेज वाचून संबंधीत पुरुषाने न्यायालयात धाव घेतली, या महिलेवर स्पर्म चोरल्याचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टेलथिंग म्हणजे जेव्हा एक पार्टनर दुसऱ्याला न कळवता सेक्स करताना कंडोम काढतो तेव्हा ही फसवणूक मानली जाते.

या खटल्यातील न्यायाधीश अॅस्ट्रिड सेलेव्स्की यांनी, “आम्ही आज ऐतिहासिक निकाल देत आहोत. पुरुष कंडोम काढतो तेव्हा स्टील्थिंग होते. परंतु उलट प्रकरणांमध्ये देखील त्याचा विचार केला जाईल.”अशी प्रतिक्रिया सुनावणी दरम्यान दिली.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.