December 1, 2022
माझी लढाई यापुढेही सुरूच - संजय पवार यांचा निर्धार | battle continues Sanjay Pawar decision Rajya Sabha elections Shiv Sainik amy 95

राज्यसभा निवडणुकीत जिंकण्याचा आत्मविश्वास होता. दुर्देवाने पराभव झाला. मी सच्चा शिवसैनिक असल्याने माझी लढाई यापुढेही सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व राज्यसभेचे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांनी व्यक्त केली.

या निवडणुकीच्या निकालानंतर पवार म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात तीस वर्षाहून अधिक काळ शिवसेनेचे काम प्रामाणिकपणे केले आहे. याची उतराई म्हणून मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेची उमेदवारी देऊन उमेदवारीची मोठी संधी दिली होती. मी विजय व्हाव्यात अशा अनेकांनी शुभेच्छा ही व्यक्त केल्या होत्या. निवडून येईन अशा प्रकारचे वातावर ही निर्माण झाले होते. परंतु दुर्दैवाने साथ दिली नाही.

हरूनही लढणार

या निवडणुकीतील पराभव मी स्वीकारत असताना विजयी उमेदवारांचेहि अभिनंदन करत आहे. मी लढणारा कार्यकर्ता असल्याने पुढील लढाईसाठी सज्ज आहे. सोमवारपासून जनसेवेचे व्रत अव्याहतपणे सुरू ठेवणार आहे,असेही पवार म्हणाले.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.