December 5, 2022
google maps sambhaji nagar aurangabad

औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली होती. या निर्णयानंतर विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. मात्र यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नव्या सरकारतर्फे यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे होणारच, नामांतराला स्थगिती दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा विषय खूपच चर्चेत आहे. नामांतराचा मुद्दा तापलेला असतानाच एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे. गुगल मॅप्सवर औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजी नगर’ करण्यात आले आहे. इतकेच नाही तर गुगलवरही औरंगाबादचे नाव बदलण्यात आले आहे. आता गुगलवर औरंगाबाद शहर असं टाइप केल्यानंतर तिथे औरंगाबादच्या जागी संभाजीनगर असं लिहून येत आहे.

आपला पर्सनल डेटा लीक होण्यापासून कसा वाचवायचा? जाणून घ्या सोप्या टिप्स

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकराने मंजुरी दिली असली तरीही एमआयएमने या निर्णयाला विरोध केला आहे. त्यामुळे आता गुगल मॅपवर संभाजीनगर असा उल्लेख आल्याने पुन्हा वादाला तोंड फुटणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.