November 27, 2022
Alien-Video-Viral

एका रहस्यमय प्राण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. एलियन्स खरंच अस्तित्वात आहेत की फक्त एक अफवा आहे? वेळोवेळी एलियन्स दिसल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. असे अनेक पुरावे देखील आहेत, जे सिद्ध करतात की एलियन्सचा या जगात वावर आहे. अलीकडेच, एक संशोधन केले गेले आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की एलियन समुद्राच्या आत राहतात. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक रहस्यमयी प्राणी पार्किंगमध्ये विचित्रपणे फिरत असल्याचे दिसून येत आहे, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक लोक त्याला एलियन म्हणत आहेत, तर अनेक लोक त्याला भूतही म्हणत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ अमेरिकेतील केंटकीमधला असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा विचित्र दिसणारा प्राणी केंटकीमधील घराजवळ येतो आणि हळू हळू कारच्या दिशेने जाताना दिसतो. अमेरिकेतील एरिया ५१ मध्ये एलियन्सवर संशोधन सुरू आहे असे अनेकांचे मत असले तरी अमेरिकन सरकार हे मान्य करत नाही. एरिया ५१ हा लष्करी तळ असल्याचे अमेरिकन सरकारचे म्हणणे आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चालत्या गाडीवर ‘शक्तिमान’ बनायला गेला अन् काही क्षणातच खाटेवर आला…

हा विचित्र प्राणी माणसासारखा कसा फिरतोय हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. @ParanormalityM नावाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले आहेत.

आणखी वाचा : द्राक्षांपासून पॉपकॉर्न बनवलेलं तुम्ही कधी पाहिलंय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : इतक्या मोठ्या पाळण्यात हा लहान मुलगा एकटाच बसला होता, VIRAL VIDEO पाहून नेटकरी पालकांवर संतापले

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, हे खूप भयानक आहे, हे एलियन्स आहे का आणखी एका यूजरने या व्हिडीओवर लिहिले आहे की, खरोखर खूप विचित्र गोष्ट. मी असा प्राणी कधीच पाहिला नाही.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.