December 5, 2022
sp srishankar

पीटीआय, बर्मिगहॅम : लांब उडी प्रकारात भारताच्या मुरली श्रीशंकरने आव्हानांवर मात करत रौप्यपदकाची कमाई केली. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पुरुष विभागात तब्बल ४४ वर्षांनी पदकाला गवसणी घातली.

श्रीशंकरने पाचव्या प्रयत्नता ८.०८ मीटर उडी मारताना आपले रौप्यपदक निश्चित केले. सुवर्णपदक विजेता बहामासचा लॅक्वान नैर्ननेही ८.०८ मीटर उडी मारली होती. अखेरचा प्रयत्न सुरू झाला, तेव्हा ‘काऊंटबॅक’चा निर्णय घेण्यात आला. यात नैर्न ७.९८ मीटर पर्यंत पोहोचला होता. श्रीशंकरला ७.९९ मीटर उडी मारायची होती. मात्र, या अखेरच्या प्रयत्नात श्रीशंकर ७.८४ मीटपर्यंतच पोहोचू शकला. त्यामुळे सर्वोत्तम दुसरा प्रयत्न या नियमाच्या आधारावर त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक हे पहिले पाऊल आहे. पॅरिस ऑलिम्पिक मला खुणावत आहे. आजपर्यंत मी कायम सहाव्या, सातव्या क्रमांकावर राहिलो. राष्ट्रकुल स्पर्धेतील या रौप्यपदकाने मला आनंद झाला आहे. मला प्रेरित करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला मी हे पदक अर्पण करतो.

– मुरली श्रीशंकर

पॅरा-पॉवरलिप्टिंग : सुधीरची सुवर्ण कामगिरी

बर्मिगहॅम : भारताच्या सुधीरने राष्ट्रकुल पॅरा-पॉवरलिप्टिंगमध्ये उच्च वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. सुधीरने १३४.५ गुणांची कमाई करताना स्पर्धा विक्रमासह ही कामगिरी केली.

आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सुधीरने पहिल्या प्रयत्नात २०८ किलो वजन उचलले. त्यानंतर सुधीरने दुसऱ्या प्रयत्नात २१२ किलो वजन उचलताना आवश्यक गुण मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. पोलिओग्रस्त असणाऱ्या सुधीरच्या कामगिरीने भारताचे या स्पर्धेतील पॅरा-विभागातील पदकाचे खाते उघडले गेले.

सुधीरने ८८ किलो वजनी गटात २१४ किलो वजन उचलून आशिया-ओशियाना विभागातून जागतिक पॅरा-पॉवरलिप्टिंग स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. 

कुस्ती : बजरंग, दीपक, साक्षी, अंशू अंतिम फेरीत

भारताचे अनुभवी कुस्तीपटू बजरंग पुनिया (६५ किलो), अंशू मलिक (५७ किलो), साक्षी मलिक (६२ किलो), दीपक पुनिया (६८ किलो) यांनी लक्षवेधी कामगिरी करताना राष्ट्रकुलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

मोहित ग्रेवालला (१२५ किलो) उपांत्य, तर दिव्या कांक्रनला (६८ किलो) उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. मोहित आणि दिव्या यांना रपेशाजमधून कांस्यपदकापर्यंत पोचण्याची संधी अजूनही आहे.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.