February 2, 2023
Vodafone idea 475 rupees recharge plan

इंटरनेटमुळे आपण घरबसल्या कोणतेही काम सहजरित्या करू शकतो. पण इंटरनेट वापरताना डेली डेटा पॅकची लिमिट संपण्याची चिंता आपल्याला सतावते. बहुतांश सर्व टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन्सचे दर वाढवले आहेत. त्यातच प्रत्येक रिचार्जसह मिळणाऱ्या डेटा ऑफरवर मर्यादा असतात. दिवसभरात इंटरनेट वापरल्यानंतर हा एका दिवसासाठी उपलब्ध होणारा डेटा लगेच संपु शकतो. त्यात जर तुम्हाला एक्स्ट्रा डेटाची गरज भासत असेल तर तुम्ही वोडाफोनचा एक रिचार्ज प्लॅन निवडु शकता. या रिचार्ज प्लॅनवर रोज सहा तासांसाठी मोफत अनलिमिटेड डेटा उपलब्ध होतो. या रिचार्ज प्लॅनची किंमत किती आहे आणि यावर काय ऑफर्स आहेत जाणून घेऊया.

अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा

  • वोडाफोन – आयडियाच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत ४७५ रूपये आहे.
  • हा रिचार्ज प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
  • या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस करण्याची सुविधा मिळते.
  • या रिचार्ज प्लॅनवर दररोज ४ जीबी डेटा उपलब्ध होतो.

WhatsApp Hack : तुमचं व्हॉटसअ‍ॅप अकाउंट दुसर कोणी वापरतय का? ‘ही’ ट्रिक वापरुन लगेच ओळखा

रोज ६ तासांसाठी मिळतो अनलिमिटेड डेटा

  • या रिचार्ज प्लॅनसह दररोज ६ तासांसाठी फ्री अनलिमिडेट डेटा उपलब्ध होतो.
  • रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत हा एक्स्ट्रा डेटा उपलब्ध होतो.
  • हा एक्स्ट्रा डेटा रोजच्या उपलब्ध होणाऱ्या डेटा पॅकमध्ये मोजला जात नाही.

विकेन्ड डेटा रोलओव्हर करण्याची सुविधा

  • या रिचार्ज प्लॅनसह विकेन्ड डेटा रोलओव्हर करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • म्हणजे सोमवार ते शुक्रवार या कालावधीत डेली डेटा लिमिटमधील उरलेला डेटा युजर्स शनिवारी आणि रविवारी म्हणजे विकएन्डला वापरू शकतात.
  • डेली डेटा रोलओव्हरची क्षमता २ जीबी आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.