December 5, 2022
sp kabbadi

मुंबई : महाराष्ट्राच्या पुरुष संघाने शुक्रवारी ‘ड’ गटात गुजरातचा ५४-२२ असा पराभव करीत ६९व्या पुरुषांच्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत दुसऱ्या साखळी विजयाची नोंद केली. या विजयासह महाराष्ट्राने आपले बाद फेरीतील स्थान निश्चित केले.

चरखी दादरी (हरयाणा) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या सत्रात दोन लोण देत २८-१३ अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात खेळ थोडा धिमा करीत आणखी एक लोण दिला. अस्लम इनामदार, आकाश शिंदे यांच्या झंझावाती चढायांना मयूर कदम, देवेंद्र कदम यांच्या नेत्रदीपक पकडींची साथ मिळाल्यामुळे हा विजय सोपा झाला.

शनिवारी सकाळच्या सत्रात महाराष्ट्राचा शेवटचा साखळी सामना तमिळनाडूशी होईल. याच सामन्याद्वारे गटविजेता आणि गटउपविजेत्याचा निर्णय होईल. मग सायंकाळच्या सत्रात उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने होतील. अन्य सामन्यांत तमिळनाडूने गुजरातला ५०-२७ असे नामोहरम केले. गतउपविजेत्या सेनादलाने पुडिचेरीला ५४-२० असे नमवले.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.