February 2, 2023
rajesh kshirsagar

कोल्हापूर : विनायक राऊत जेथे जातील त्या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय जात नाहीत. निवडणुका असो किंवा कोणताही कार्यक्रम असू दे, त्यांची बॅग तयार ठेवायला लागते, असा गंभीर आरोप माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी केला आहे. शिवसेनेचे सचिव, खासदार विनायक राऊत  यांनी कालच्या शिवसेना मेळाव्यात राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका केली होती. राऊत यांच्यावर पलटवार करताना  क्षीरसागर म्हणाले,की दुसऱ्यांचे ऐकून माझ्यावर ते चुकीचे आरोप करत असतील, तर शिवसेना संपवण्याचे कंत्राट राऊत यांनी घेतले आहे हेच स्पष्ट होते.

खासदार शिंदे गटाबरोबर?

या वेळी क्षीरसागर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील संजय मंडलिक आणि  धैर्यशील माने  हे दोन्ही खासदार लवकरच बंडखोर शिंदे गटात दिसतील, असा दावा केला आहे. कालच्या शिवसेना मेळाव्याला हे दोन्ही खासदार अनुपस्थित होते. मंडलिक यांनी दिल्लीत असल्याचे तर माने यांनी तब्येत बरी नसल्याने उपस्थित नसल्याचा खुलासा करण्यात आला होता.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.