February 3, 2023
shahu mane of kolhapur won gold medal in world shooting

कोल्हापूर : कोल्हापूरची क्रीडा परंपरेची पताका आंतरराष्ट्रीय नेमबाज शाहू माने याने उंचावली आहे. त्याने मेहूली घोष हिच्या साथीने कोरिया येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल मिश्र या प्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

शाहू माने हा येथील केआयटी कॉलेजमध्ये अभियांत्रिक शाखेत दुसऱ्या वर्गात शिकत आहे. भारतीय संघाच्या संघाच्या अर्जुन पुरस्कार विजेत्या प्रशिक्षक प्रशिक्षिका सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नेमबाजीचे प्रशिक्षण घेतले. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुवर्णपदक मिळवत शिष्याकडून गुरूला सुवर्णमय भेट दिली. शाहू व मेहूली या दोघांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व विश्वचषक स्पर्धेत केले. पात्रता फेरीत या दोघांनी ६३४.३ इतके सर्वाधिक गुण मिळवत सुवर्णपदकावर दावा केला होता. त्यांनी ६०३. ३ गुण घेणाऱ्या हंगेरीन संघाला मागे टाकले.  अंतिम फेरीत त्यांना हंगेरीच्या खेळाडूंची सामना करावा लागला. त्यांचे स्पर्धक ऑलम्पिक खेळाडू इस्तर मेसझारोस व इस्तवान पेनी हे अनुभवी होते. त्यांनी अनुभवाच्या आधारे दमदार सुरुवात केली होती. मात्र अखेरच्या क्षणी खेळ उंचावत शाहू व मेहुली या दोघांनी अचूक नेमबाजी करीत १७ विरुद्ध १३ गुणांनी सुवर्णपदकाची कमाई केली.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.