February 4, 2023
whatsapp electricity message scam

आजकाल सर्व पेमेंट्स ऑनलाईन केले जातात. त्यामुळे आपले बँक खाते या ऑनलाईन पेमेंट्ससाठी अनेक वेबसाईट्सशी जोडलेले असते. घरबसल्या काही क्षणांमध्ये सर्व पेमेंट्स करण्याची ही सोय तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शक्य झाली आहे, पण यामुळेच सायबर क्राइमसारख्या समस्या देखील उद्भवत आहेत. याचाच प्रत्येय सध्या सुरू असणाऱ्या एका व्हॉटसअ‍ॅप स्कॅममुळे येत आहे.

सध्या काही जणांना व्हॉटसअ‍ॅपवर वीजबिलासंबंधित एक मेसेज येत आहे. हा मेसेज स्कॅम असल्याची माहिती समोर आली आहे. हॅकर्सकडुन ऑनलाईन पेमेंट्सद्वारे तुमचे व्हॉटसअ‍ॅप अकाउंट हॅक केले जात आहे आणि त्याद्वारे हा मेसेज पाठवला जात आहे. या मेसेजमध्ये लगेच वीजबिल भरले नाही तर वीज कनेक्शन कापण्यात येईल असे लिहण्यात आले आहे, त्यामुळे युजर्स त्या लिंकवरून वीजबिल भरत आहेत आणि हॅकर्सच्या जाळ्यात अडकत आहेत.

आणखी वाचा : दैव बलवत्तर म्हणून… काम सुरू असताना लॅपटॉपचा स्फोट झाला अन्… तरुणीच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अपघात

‘प्रिय ग्राहक तुमचे मागच्या महिन्याचे वीजबिल न भरल्यामुळे, आज रात्री ९.३० वाजता तुमचे वीज कनेक्शन बंद केले जाईल. इलेक्ट्रिसिटी ऑफिसरला तात्काळ संपर्क साधा – ८२६०३०३९४२ धन्यवाद.’ असा आशय या मेसेजमध्ये लिहला आहे.

जर तुम्हालाही असा मेसेज आला तर घाईमध्ये वीजबिल भरण्याआधी तो मेसेज कोणत्या वेबसाईटवरून आला आहे, ते चेक करा. जर ती वेबसाईट विश्वासार्ह नसेल तर त्यावर वीजबिल भरून तुमचे पैसे वाया घालवू नका असा सल्ला देण्यात आला आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.