December 5, 2022
KKR Players Hang Out

बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानची सहमालकी असलेला कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) आयपीएल संघ चाहत्यांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. या संघाने आतापर्यंत आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. येत्या हंगामामध्ये आपली कामगिरी आणखी उंचावण्यासाठी केकेआर संघ व्यवस्थापनाने कंबर कसली आहे. त्यासाठी भारतीय संघासोबत असलेले खेळाडू वगळता इतर सर्व खेळाडूंना मुंबईमध्ये बोलवून घेण्यात आले आहे. केकेआरने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. केकेआरचे काही खेळाडू मुंबईमध्ये एकत्र फिरताना दिसले.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामासाठी अद्याप बराच वेळ आहे. परंतु, केकेआरचे खेळाडू पुन्हा एकदा जमले आहेत. या खेळाडूंनी गुरुवारी (४ ऑगस्ट) मुंबईतील एका चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला. नितीश राणा, अभिषेक नायर, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, अमन खान आणि प्रथम सिंग यांच्यासह संघामधील अनेक सदस्य या लंच हॉटेलमध्ये एकत्र दिसले.

संघाचे प्रशिक्षक आर श्रीकांत आणि सहाय्यक प्रशिक्षक सागर एम हे देखील या खेळाडूंसोबत होते. या सर्वांनी एकत्र जेवण केल्यानंतर काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. केकेआरनेदेखील आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर खेळाडूंचे फोटो पोस्ट केले आहेत.

हेही वाचा – टी २० विश्वचषकापूर्वीच लागणार भारतीय संघाची कसोटी! ऑस्ट्रेलिया अन् दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

केकेआरचे हे सर्व खेळाडू मुंबईतील ‘केकेआर अकादमी’मध्ये तयारी करण्यासाठी मायानगरीत दाखल झाले आहेत. हे सर्व खेळाडू ३१ जुलै रोजी मुंबईत पोहोचले होते. खेळ अधिक चांगला करण्यासाठी त्याने आपल्या आयपीएल संघाच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला आहे. आयपीएलमधील अनेक मोठ्या संघांनी जगभरात त्यांच्या अकादमी सुरू केल्या आहेत. या ठिकाणी क्रिकेटमध्ये येऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.