December 1, 2022
chandrakant-patil-1-1

कोल्हापूर : राज्यात सध्या ज्या राजकीय हालचाली सुरू आहेत त्याच्याशी भाजपचा काडीमात्र संबंध नाही. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपकडे प्रस्ताव आल्यास त्यावर विचार केला जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. आमदार पाटील म्हणाले,की देवेंद्र फडणवीस हे गेले तीन दिवस सतत कार्यकर्त्यांच्या कामासाठी दिल्लीला जात आहेत. शिवसेनेतील बंडामागे कोणता राष्ट्रीय पक्ष आहे हे शिंदे यांनाच विचारावे लागेल. राज्यात ज्या काही हालचाली सुरू आहेत, त्या दूरचित्रवाणीवरच दिसतात. आपला त्याच्याशी संबंध नाही. शिंदे यांच्यासोबत कोण गेलेत, कोण जाणार आहेत, कोण परत येणार आहेत याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही. शरद पवार, संजय राऊत यांना जरा जास्तच अभिव्यक्तिस्वातंत्र्य असल्याने ते सतत बोलत असतात. राऊत तर सकाळी एक तर दुपारी दुसरेच बोलतात, असा चिमटा त्यांनी काढला.  शिंदे यांच्यासोबत मोहित कंबोज असतील तर मित्र असल्याने असतील. कंबोज हे सर्व पक्षातील नेत्यांचे मित्र आहेत. त्यामुळे कदाचित ते सर्वत्र दिसतात. शिंदे यांच्याकडून भाजपला प्रस्ताव आला,तर पक्षाची १३ जणांची कार्यकारिणी चर्चा करून प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.