December 5, 2022
Shivsena Yuva Sena Aaditya Thackeray Nishtha Yatra

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेतील अनेक प्रमुखांनी पाठिंबा दिल्याने या गटाचे वर्चस्व वाढत चालले असल्याच्या पार्श्वभूमीवर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा उद्या सोमवारी कोल्हापूर जिल्हा दौरा होत आहे.

एकनाथ शिंदे यांना कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार, माजी आरोग्य राज्यमंत्री, आमदार, माजी आमदार यांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे अस्तित्व निस्तेज होत असल्याचे राजकीय चित्र आहे.

फुटीरांचा समाचार

या पार्श्वभूमीवर शिवसेनेने चैतन्य जागवण्यासाठी आदित्य ठाकरे सोमवारी प्रथम आजरा येथे सभा घेणार आहेत. आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात ठाकरेंची तोफ सभेत गरजण्याची शक्यता आहे. ते दुपारी कोल्हापुरात येणार आहेत. शहर शिवसेना समन्वयक हर्षल सुर्वे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मिरजकर तिकटी येथे होणार आहे. येथे होणाऱ्या सभेत ते माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा समाचार घेतील. मंगळवारी ते जयसिंगपूर येथे सभा घेणार आहेत. यावेळी माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने यांच्यावर टीकास्त्र डागतील असे चित्र आहे.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.