February 2, 2023
blaupunkt-tv

देशातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर एंड ऑफ सीझन सेल सुरू झाला आहे. हा सेल १४ जुलै २०२२ पासून सुरू होईल आणि १८ जुलै २०२२ पर्यंत चालेल. ५ दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये जर्मन टीव्ही कंपनी Blaupunkt कडून स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची संधी आहे. या सेलमध्ये ३२ इंच ते ६५ इंचापर्यंतचे टीव्ही बँक ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआय व्यतिरिक्त एक्सचेंज ऑफरमध्ये घेऊ शकता. Flipkart वरून SBI क्रेडिट कार्डने हे टीव्ही खरेदी करण्यावर तुम्हाला १० टक्के झटपट सूट देखील मिळू शकते.

परवडणारी किंमत असलेली हिरो मॉडेल Blaupunkt ची CyberSound ३२ इंचाची टीव्ही १२,४९९ रूपयांमध्ये मिळू शकते. या टीव्हीमध्ये HD-रेडी स्क्रीन आहे आणि या टीव्हीला ४० W स्पीकर आउटपुट मिळतो. या टीव्हीमध्ये ड्युअल स्पीकर देण्यात आले आहेत.
Hero मालिकेतील ४२ इंचाची टीव्ही १७,९९९ रुपयांना विकत घेता येईल. या टीव्हीमध्ये ४२ इंच फुलएचडी (१,९२०×१०८० पिक्सेल) स्क्रीन आहे. या टीव्हीमध्ये Android 9, अल्ट्रा-थिन बेझल, १ GB रॅम आणि ८ GB स्टोरेज आहे. या टीव्हीला २ स्पीकरसह ४० W साउंड आउटपुट देखील मिळतो.
४३ इंचाच्या टीव्हीबद्दल बोलायचे झाल्यास हा टीव्ही अल्ट्रा-एचडी (३,८४०×२,१६० पिक्सेल) स्क्रीनसह येतो. हा टीव्ही फ्लिपकार्ट सेलमधून २६,९९९ रुपयांना घेता येईल. या टीव्हीमध्ये अँड्रॉइड 10, २ जीबी रॅम, ८ जीबी स्टोरेज सारखे फीचर्स आहेत. साउंड आउटपुट ५० W आहे. हा टीव्ही बेझल-लेस डिझाइनसह येतो. यात डॉल्बी डिजिटल प्लस, डीटीएस सराउंड साउंड सपोर्ट आहे.

आणखी वाचा : Aadhaar Card : अशा प्रकारे आधार कार्ड ऑनलाईन डाउनलोड करा, जाणून घ्या सोपी पद्धत

५० इंच स्क्रीन असलेल्या Blopunkt स्मार्ट टीव्हीमध्ये अल्ट्रा-एचडी स्क्रीन आहे. हा टीव्ही ३३,९९९ रुपयांना सेलमध्ये घेता येईल. या टीव्हीमध्ये Android 10 OS देण्यात आला आहे. याशिवाय डॉल्बी डिजिटल प्लस, डीटीएस ट्रूसराऊंड साउंड, ४ स्पीकर, २ जीबी रॅम आणि ६० डब्ल्यू स्पीकर आउटपुट उपलब्ध आहेत.

आणखी वाचा : तुम्हाला 5G स्मार्टफोन घ्यायचाय? मग ५० MP कॅमेराच्या Moto G71 5G वर असलेल्या ऑफरचा नक्की विचार करा

सेलमध्ये ५५ इंचाच्या Blopunkt स्मार्ट टीव्हीची किंमत ३८,९९९ रुपये आहे. या टीव्हीला अल्ट्रा-एचडी स्क्रीन आहे. टीव्ही डॉल्बी डिजिटल प्लस, डीटीएस साऊंड प्रमाणित ऑडिओ, डॉल्बी एमएस12 साउंड टेक्नॉलॉजीसह ६० W साउंड आउटपुट ऑफर करतो. ६५ इंचाचा Blopunkt Smart Android TV सीझन सेलच्या शेवटी फ्लिपकार्टमध्ये ५५,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. या टीव्हीमध्ये Android 10 OS आहे. टीव्हीमध्ये ६० W स्पीकर आउटपुट आहे.

याशिवाय, कंपनीचा नुकताच लॉंच झालेला ४० इंचाचा टीव्ही (१५,९९९ रुपये), ४३ इंचाचा टीव्ही (१९,९९९ रुपये) फ्लिपकार्ट सेलमध्ये घेता येईल. या टीव्हीमध्ये १ GB रॅम, ८ GB स्टोरेज आणि ३ HDMI पोर्ट आहेत.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.