December 5, 2022
ben stroke

चेस्टर-ली-स्ट्रीट : रॅसी व्हॅन डर डसनची १३४ धावांची खेळी आणि आनरिख नॉर्कीएचे चार बळी या बळावर दक्षिण आफ्रिकेने पहिला एकदिवसीय सामन्यात ६२ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यावर विरजण पडले.

आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ३३३ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. डसनने जानेमन मलान (५७) व एडिन मार्करम (७७) यांच्या साथीने अनुक्रमे दुसऱ्या गडय़ासाठी १०९ आणि तिसऱ्या गडय़ासाठी १५१ धावांच्या भागीदाऱ्या केल्या.

त्यानंतर, इंग्लंडचा डाव २७१ धावांत आटोपला. इंग्लंडकडून जेसन रॉय (४३) आणि जॉनी बेअरस्टो (६३) यांनी १०२ धावांची सलामी दिली. मग जो रूटने ७७ चेंडूंत ८६ धावांची खेळी साकारली. कसोटीचे कर्णधारपद आणि ट्वेन्टी-२० क्रिकेट यांचा खेळातील ताण सांभाळण्यासाठी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणाऱ्या स्टोक्सने गोलंदाजीत पाच षटकांत ४४ धावा देताना एकही बळी मिळवला नाही. याचप्रमाणे फलंदाजीतही तो फक्त ५ धावांवर बाद झाला. त्याला प्रेक्षकांनी उभे राहून मानवंदना दिली.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.