December 1, 2022
Smriti Mandhana CWG 2022

भारतीय महिला क्रिकेट संघातील सलामीवीर स्मृती मंधानाला धडाकेबाज फलंदाजी करणारी खेळाडू म्हणून ओळखले जाते. फलंदाजीच्या जोरावर तिने आतापर्यंत अनेक विक्रम स्वत:च्या नावावर नोंदवलेले आहेत. दरम्यान, सध्या बर्मिंघम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही ती चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करत आहे. बुधवारी या स्पर्धेतील दहवा सामना भारत आणि बार्बाडोस या दोन देशांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात मंधाना चांगली कामगिरी करू शकली नाही. मात्र तिने या सामन्यात पाच धावा करून स्वत:च्या नावावर विश्वविक्रम नोंदवला आहे. सलामीवीर म्हणून टी-२० सामन्यांत २००० धावा करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. या कामगिरीसह ती भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या पंक्तीत जाऊन बसली आहे.

हेही वाचा >> Commonwealth Games: भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी; उंच उडी, ज्युडो, वेटलिफ्टिंग आणि स्क्वॉशमध्ये केली पदकांची कमाई

राष्ट्रकुल स्पर्धेत बुधवारी बार्डाडोस आणि भारत यांच्यात झालेल्या सामन्यात स्मृती मंधाना चांगली कामगिरी करू शकली नाही. तिने या सामन्यात ५ धावा केल्या. मात्र या धावांसह टी-२० सामन्यांत सलामीवीर म्हणून २००० हजार धावा करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठऱली आहे. याआधी हा विक्रम फक्त रोहित शर्मा नोंदवू शकलेला आहे. रोहित शर्माने टी-२० सामन्यांत सलामीवीर म्हणून आतापर्यंत २९७३ धावा केल्या आहेत.

हेही वाचा >> बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : भारतीय महिला संघाचा बलाढय़ जॉर्जियावर सनसनाटी विजय

स्मृती मंधानाने टी-२० सामन्यांत सलामीला फलंदाजीसाठी येऊन २००० धावा पूर्ण केल्या आहेत. तिने सलामीवीर म्हणून ८० सामन्यांत एकूण २००४ धावा केल्या आहेत. तर एकूण ९० टी-२० तिने २६.२३ रनरेटने २१२५ धावा केल्या आहेत.

हेही वाचा >> India W vs Barbados W T20 in CWG 2022: बार्बाडोसचा पराभव करून भारताची उपांत्य फेरीत धडक; जेमिमाह अन् रेणुकाची शानदार कामगिरी

दरम्यान, भारत आणि बार्बाडोस यांच्यात झालेल्या सामन्यात बार्बाडोसने सुरुवातीला गोलंदादी करण्याचा निर्णय घेतला. तर सुरुवातीला फलंदाजीसाठी येत भारताने १६३ धावा केल्या. विजयासाठी १६४ धावांचा पाठलाग करताना बार्बाडोसचा संघ आठ गडी गमावून फक्त ६२ धावा करू शकला. परिणामी या सामन्यात भारताचा १०० धावांनी विजय झाला.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.