November 27, 2022
Moto-G60

मोटोरोलाने फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये आपल्या स्मार्टफोन्सवर सूट जाहीर केली आहे. कंपनी आपले लोकप्रिय Moto G आणि Motorola Edge सीरिज फोन २३ ते २७ जुलै या कालावधीत आकर्षक ऑफर्ससह Flipkart वर उपलब्ध करून देईल. तुम्हालाही मोटो फोन घ्यायचा असेल, तर सेलमध्ये चांगली संधी आहे.

Flipkart Big Saving Days सेल २३ जुलैपासून सर्वसामान्यांसाठी सुरू झाला आहे. सेलमध्ये Moto G51, Moto G71, Moto G60, Moto G31 आणि Motorola Edge 20 Fusion सह अनेक फोन स्वस्त मिळत आहेत. सेलमध्ये तुम्ही कोणते मोटोरोला स्मार्टफोन्स डिस्काउंटसह घेऊ शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आणखी वाचा : IRCTC वेबसाईटवरून घरबसल्या Tatkal Ticket बुक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

Flipkart Big Saving Days Best Deals
Moto G-सिरीजपासून सुरू होणारा, Moto G71 5G स्मार्टफोन १४,९९९ रुपयांच्या बँक ऑफरसह मिळू शकतो. Moto G71 मध्ये Snapdragon 695 प्रोसेसर आणि Amload FullHD+ डिस्प्ले सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे जी ३३ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Moto G51 स्मार्टफोन हा कंपनीचा परवडणारा 5G फोन आहे. या फोनमध्ये १२० Hz च्या रिफ्रेश रेटसह ६.८ इंच स्क्रीन आहे. हा स्मार्टफोन ११,९९९ रुपयांना खरेदी करता येईल.

Moto G31 हा परवडणारा स्मार्टफोन आहे. यात AMOLED डिस्प्ले आहे. हँडसेटमध्ये ५० मेगापिक्सेल क्वाड फंक्शन कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन ९,४९९ रुपयांना ऑफरसह खरेदी केला जाऊ शकतो.

आणखी वाचा : Samsung Blue Fest : फ्रीज खरेदीवर Galaxy S22 स्मार्टफोन फ्री, ३० टक्क्यांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळेल

Moto G60 स्मार्टफोन सेलमध्ये ऑफरसह १३,९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. या फोनमध्ये ६.८ इंचाचा फ्लुइड डिस्प्ले आहे जो HDR10 ला सपोर्ट करतो. फोनमध्ये १०८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. शक्तिशाली Qualcomm Snapdragon 732G प्रोसेसर हँडसेटमध्ये आहे.

Moto G40 Fusion मध्ये शक्तिशाली Snapdragon 732G प्रोसेसर देण्यात आला आहे. हा Moto फोन सेलमध्ये १२,९९९ रुपयांना मिळण्याची संधी आहे.

Moto G22 स्मार्टफोन Android 12 सह येतो. ८,९९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीसह हा बजेट फोन सेलमध्ये घेण्याची संधी आहे.

एज सीरिजबद्दल बोलायचे झाले तर, मोटोरोला एज 20 फ्यूजनचा हा फोन १६,९९९ रुपयांना सेलमध्ये उपलब्ध होईल. स्मार्टफोनमध्ये १०-बिट AMOLED 90Hz डिस्प्ले आहे. हा फोन १३ 5G बँडला सपोर्ट करतो.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.